आत्मप्रेम

प्रोत्साहन व शिस्त

प्रोत्साहन व शिस्त ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्य यशस्वीरित्या पुढे नेण्यासाठी प्रेरक हेतू पाहिजे असतो. अन्यथा आपल्या जीवनाला काहिही अर्थ उरत नाही. एखाद्या व्यक्तीस दररोज कामावर जाण्यासाठी कोणाकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता नसते. कारण कुटूंबाप्रती असलेल्या त्याच्या जबाबदार्‍या व त्याची कर्तव्ये त्याच्यासाठी प्रोत्साहनाचे काम करतात. परंतू त्याला त्याच्या कामात उन्नती करावयाची असेल तर मात्र […]

प्रोत्साहन व शिस्त Read More »

आपले स्वत:बरोबरचे नाते

आपण जन्म घेताच आपल्या सभोवताल नात्यांचे असे जाळे असते जे आपल्याला प्रेमाची उब प्रदान करण्यास आतुर असते. आपली काळजी घेण्यापासून ते आपल्याला लहानाचे मोठे करण्यापर्यंत, आपल्यावर संस्कार करण्यापासून ते आपल्या जीवनाचा उत्तुंग प्रवास डोळे भरून बघण्यापर्यंत ही जीवाभावाची नाती आजीवन तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या काटेकोर निरीक्षणाखाली आपले एक अद्वीतीय व्यक्तीमत्व आकार घेवू लागते. ज्याचे खरे शिल्पकार

आपले स्वत:बरोबरचे नाते Read More »

मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज

माणसाचा स्वभाव हा माणसाची ओळख असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी कोणाकडे माहिती काढली तर त्याच्या स्वभावाबद्दल आवर्जून बोलले जाते. जर कोणी जास्त बोलणारा असेल तर त्याच्याविषयी सकारात्मक बोलले जाते. जसे तो मनमिळाऊ आहे, त्याच्या मनात काही राहत नाही, साफ मनाचा आहे, बोलून मोकळा होतो. परंतू जो शांत स्वभावाचा असतो, लाजरा असतो तसेच सहज कोणाशी काही बोलण्यास ज्याला कष्ट पडतात.

मितभाषी स्वभावाविषयी गैरसमज Read More »

आपल्यातील विशेषतांना श्रेष्ठत्वास न्यावे

 निसर्गाशी आपले घनिष्ठ नाते असो वा नसो तरिही निसर्गापासून आपल्याला खुप काही शिकावयास मिळते. निसर्ग हा जीवनदाता आहे. निसर्गात सर्वत्र मुबलकता, समृद्धी व भरभराट आहे. तसेच निसर्गातील प्रत्येक गोष्ट तिच्या अस्सल गुणधर्मात विराजमान आहे. तसेच तिथे तिचे महत्वाचे स्थान देखील आहे. तिच्या असण्याला अर्थ प्राप्त आहे. जसे सर्वदूर पसरलेले भव्य निळेशार आकाश आपल्याला प्रगतीचे पंख लावून

आपल्यातील विशेषतांना श्रेष्ठत्वास न्यावे Read More »

अंतर्मनाचे सौंदर्य

जी व्यक्ती आंतरीक सौंदर्याने समृद्ध असते ती देवाचीही लाडकी असते. त्या व्यक्तीचे पडणारे प्रत्येक पाऊल देव अलगद टिपतो. संकटसमयी वेगवेगळ्या स्वरूपात त्याच्या पाठीशी उभा राहतो. अंतर्मनाच्या माध्यमातून त्याचे मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे एक बालहृदय निरागस, निष्पाप व निर्दोष असते. आपल्याला  त्यास आजीवन तसेच जोपासता आले तर सृष्टीने दाखवीलेल्या मार्गावर आपण निर्भीडपणे मार्गक्रमण करू शकतो. परंतू जेव्हा त्या अंतर्मनाच्या सौंदर्यावर

अंतर्मनाचे सौंदर्य Read More »

जिद्द

 जीवनात आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी किंवा सद्द्य परिस्थितीचा कायापालट करण्यासाठी कठोर परीश्रमांना अन्य पर्याय नसतो. तसेच ते कठोर परीश्रम योग्य दिशेने व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केले गेले तरच फळास येतात. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या परीश्रमांना आपल्या अंतर्मनातील जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीची अजोड साथ लाभली. तरच कल्पनेतील विश्व जीवनात प्रत्यक्ष रूपात निश्चीतपणे साकार होते.

जिद्द Read More »

जीवनात सवयींचे महत्व

 दिवस उजाडला कि सूर्य उगवणार हे आपल्याला इतके सवयीचे झालेले असते कि त्याविषयी आपल्या मनात कधीही शंका उद्भवत नाही. कारण ते एक शाश्वत सत्य आहे. अशाप्रकारे सवयींनी आपली मानसिकता घडत जाते. तर मानसिकतेने आपले जीवन आकार घेत असते. त्यामुळे चांगल्या सवयी ह्या आयुष्यात ध्येय गाठण्याचा महामार्ग असतात. तसेच वाईट सवयी आपल्याला रसातळाला घेवून जावू शकतात.

जीवनात सवयींचे महत्व Read More »

आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया

 आपले स्वत:बरोबरचे नाते जोपर्यंत उत्तम होत नाही. आपण स्वत:ला जोपर्यंत सखोल जाणून घेत नाही. तसेच आपणही चुकू शकतो. हे जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे मान्य करत नाही. तोपर्यंत आपले इतरांशी वाद व इतरांचा आपल्याला विरोध हा होतच राहतो. कारण काही निवडक नाती वगळता आपल्याशी संबंधीत इतर लोक हे मुख्यत्वे करून अपेक्षा व औपचारीकतेच्या माध्यमातून आपल्याबरोबर जुळलेले असतात.

आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया Read More »