जनरल

प्रोत्साहन व शिस्त

प्रोत्साहन व शिस्त ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आयुष्य यशस्वीरित्या पुढे नेण्यासाठी प्रेरक हेतू पाहिजे असतो. अन्यथा आपल्या जीवनाला काहिही अर्थ उरत नाही. एखाद्या व्यक्तीस दररोज कामावर जाण्यासाठी कोणाकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता नसते. कारण कुटूंबाप्रती असलेल्या त्याच्या जबाबदार्‍या व त्याची कर्तव्ये त्याच्यासाठी प्रोत्साहनाचे काम करतात. परंतू त्याला त्याच्या कामात उन्नती करावयाची असेल तर मात्र […]

प्रोत्साहन व शिस्त Read More »

मदतीचा हेतू व पद्धत

माणुसकी हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. प्रत्येकाने तो एक माणुस म्हणून अन्य माणसाशी वागतांना पाळणे अनिवार्य आहे.त्याचप्रमाणे आपला कोणाची मदत करण्याच्या मागचा हेतूही माणुसकीचाच असला पाहिजे. आपण कोणा गरजूस केलेली निरपेक्ष मदत आपल्या आणि गरजूलाही समाधान देवू शकली  पाहिजे. त्यामुळे मदत करतांना आपल्या मनात करुणेचे भाव असणे महत्वाचे असते.    बर्‍याचदा आपल्या घरात जुन्या वस्तू, कपडे साठतात.

मदतीचा हेतू व पद्धत Read More »

घरात स्थिर उत्पन्न असण्याचे फायदे

 एकोणिसाव्या शतकात बहुतांशी लोक सरकारी नोकर्‍या करत असतांना दिसत असत. फार कमी म्हणजे विशिष्ट समाजातील लोकच व्यवसायांशी जुळलेले असायचे. तेव्हा जास्तीत जास्त घरांमध्ये पुरूष एकटा कमविणारा असायचा कारण घरातील स्त्रिया गृहिणीचे कर्तव्य पार पाडत असत. परंतू तरिही घरात आर्थिक नियोजन हे इतके सुनियोजीत असायचे कि एकट्या कमविणार्‍याच्या अत्यंत कमी वेतनातही संपुर्ण कुटूंब सुख समाधानाने जीवन

घरात स्थिर उत्पन्न असण्याचे फायदे Read More »

आशिर्वादांची जमापुंजी

जेव्हा आपली प्रिय व्यक्ती मृत्युच्या दारात उभी असते. तसेच मृत्युला हुलकावणी देण्यासाठी हॉस्पिटलच्या बेडवर संघर्ष करत असते. त्यावेळी विज्ञानानेही हात टेकलेले असतात. पुढे काय होईल ह्याची शाश्वती नसते. अशावेळी सगळे मनोमन त्या व्यक्तीच्या जीवनाच्या सुरक्षेकरीता प्रार्थना करीत असतात. परंतू आपल्या सर्वांच्या त्या प्रार्थनेस व आशिर्वादास मात्र सृष्टीच्या विशाल उर्जेचे पाठबळच प्रभावशाली बनवीत असते. तेव्हाच एखादा

आशिर्वादांची जमापुंजी Read More »

वारसा

आजच्या आधुनिक युगातील पिढीने नव्याचा ध्यास घेतलेला आहे. ज्यात परप्रांतीय पेहरावा पासून खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत सर्वकाही बदलले आहे. पूर्वी जे पेहराव दैनंदिन जीवनाचा भाग होते ते आता विशेष कौटूंबिक कार्यक्रमासाठी किंवा इतरही सांस्कृतीक कार्यक्रमात खास पोषाख म्हणून वापरले जावू लागले आहेत. घरात लहान मुलांना मातृभाषेऐवजी इंग्रजी बोलण्याचे शिकवण्यात येवू लागले आहे. जेणेकरून ते इंग्रजी बोलण्यात तरबेज

वारसा Read More »

दुसरी संधी

जीवनात कधी मागे वळून बघण्याची सवड मिळाली  किंवा इच्छा झाली. तर आपल्याला भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचे स्वरूप बदलवून त्यांना पुन्हा जगावेसे वाटते. कारण त्यामुळे वर्तमानातील अनेक दृश्य वेगळी व आपल्याला पाहिजे तशी असू शकली असती. परंतू अर्थातच ही कल्पना कधीही सत्यात उतरविता येत नाही. म्हणूनच बर्‍याचदा आपल्या आसपास अनेकांना आपण म्हणतांना ऐकतो कि पुन्हा संधी

दुसरी संधी Read More »

विकास आणी त्याचा अर्थ

विकसीत होत जाणे तसेच प्रगती करणे हा सृष्टीचाच नियम आहे. निसर्गाच्या नियमात प्रत्येक अतिसुक्ष्म, सुक्ष्म गोष्टींचाही विचार असतो. त्यात सृष्टी व जीवसृष्टी यांच्यात ताळमेळ असतो. एका गोष्टीमुळे दुसरीचा विकास होण्यास आपोआपच मदत होते. जमीन आईप्रमाणे तिच्यावर वास्तव्य करणार्‍या जीवजंतू, वनस्पतींचा सांभाळ करते. जेव्हा ग्रिष्माच्या रखरखत्या उन्हाने जमिनीच्या पोटातील पाणि दुरवर निघून जाते तरिसुद्धा काही वनस्पती जमिनीवर तग

विकास आणी त्याचा अर्थ Read More »

आपली अद्वितीय ओळख

सृष्टीच्या नियमाप्रमाणे आपण जीवन मृत्यूच्या फेर्‍यात अडकलेलो असतो. परंतू आपल्या शरिराला मृत्यू येणे म्हणजे आपला अंत होणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर मृत्यू येणे म्हणजे एका शरिराचा त्याग करून त्यातील जीवनरूपी उर्जेने सृष्टीच्या विशाल उर्जेत समाविष्ट होणे. तसेच पुन्हा नव्या शरिराच्या रुपात जन्म घेण्यासाठी शर्यतीत सहभागी होणे. अशाप्रकारे जुन्याचा अंत होवून नव्याची सुरवात होण्याची

आपली अद्वितीय ओळख Read More »

पाळीव प्राण्यांचा सहवास

 अनादी काळापासून प्राणि हे माणसाचे मित्र राहिले आहेत. त्याचप्रमाणे माणसाने त्यांचा वेगवेगळ्या कामांसाठी उत्तमरीतीने वापरही केलेला आहे. पूर्वी जेव्हा वाहतुकीच्या साधनांचा शोध लागला नव्हता. तेव्हा घोडा, बैलगाड्या ह्यांच्या सहाय्याने लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जात असत. तसेच शेती करण्यासाठी बैलाचा व गाढवाचा वापर करण्यात येत असे. माल वाहतुकीसाठीही गाढवांचा वापर केल्या जात असे. तसेच राज्यांच्या सिमा

पाळीव प्राण्यांचा सहवास Read More »

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे

जगाच्या पाठीवर आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवायचा असेल तर आपले प्रभाव पाडणारे व्यक्तीमत्व जगासमोर आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात नियमीतपणे काही महत्वपुर्ण गोष्टी आपण आपल्या वर्तनातून किंवा इतरांशी केलेल्या व्यवहारातून करत राहणे आवश्यक असते. ज्यामुळे आपल्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उजागर होत जातात. त्याचप्रमाणे आपण आंतरीकदृष्ट्या कणखर तसेच धाडसी होत जातो. त्यासोबत आपण आपल्या प्रत्येक

आपले प्रभावी व्यक्तीमत्व उभारावे Read More »