मानसिक स्वाथ्य

भीतीवर विजय कसा मिळवावा

 जीवन सुंदर आणि सीमित आहे. आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण उत्साहीतपणे, आनंदाने व विपरीत परिस्थितीतून धाडसाने मार्ग काढत जगाला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या प्रत्येक क्षणास स्मरणीय व अर्थपूर्ण बनविले पाहिजे. तरच आपल्या मनाचा प्रत्येक कप्पा मोकळा होतो. तसेच आपले जीवन इतरांसाठी एक उत्कृष्ठ उदाहरण ठरते. आपण मात्र जीवनभर पैसे कमविण्याचे मशीन बनून रडत कुढत व तक्रारी […]

भीतीवर विजय कसा मिळवावा Read More »

सुखाचा शोध

आपल्यापैकी कोणासही आजतागायत सुखाची परिभाषा पूर्णपणे कळलेली नाही. त्यामुळे आपण आपआपल्या तर्क वितर्का प्रमाणे सुखाचा वेगवेगळा अर्थ लावत असतो. कोणी भौतिक श्रीमंतीशी सुखाला जोडतात. तर कोणी सेवाभावातून सुख अनुभवत असतात. तसेच कोणी त्यागाच्या परीसिमेतून दैवी सुखाचा आनंद घेतात. परंतू प्रत्येकास सुख व जगण्याचे समाधान पाहिजे असते. दु;खाला आनंदाने मिठी मारणारे बोटांवर मोजण्याइतकेच असतात. परंतू त्यांच्या

सुखाचा शोध Read More »

आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया

 आपले स्वत:बरोबरचे नाते जोपर्यंत उत्तम होत नाही. आपण स्वत:ला जोपर्यंत सखोल जाणून घेत नाही. तसेच आपणही चुकू शकतो. हे जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे मान्य करत नाही. तोपर्यंत आपले इतरांशी वाद व इतरांचा आपल्याला विरोध हा होतच राहतो. कारण काही निवडक नाती वगळता आपल्याशी संबंधीत इतर लोक हे मुख्यत्वे करून अपेक्षा व औपचारीकतेच्या माध्यमातून आपल्याबरोबर जुळलेले असतात.

आत्मप्रेम नात्यांचा भक्कम पाया Read More »

एकटेपणाने आयुष्य वेढले

 आपण ह्या जगात एकटे जन्मास येतो आणि ह्या जगातून निरोप घेत असतांनाही एकटेच असतो. जे जीवनात आपल्या बरोबर असतात. तसेच आपण गेल्यानंतर आपल्या मृत शरीरावर अंतिम संस्कार होईस्तोवर थांबलेले असतात ते आपले सहप्रवासी असतात. आपण जिवंतपणी आपल्या सहप्रवास्यांच्या आयुष्यातही आपले योगदान देत असतो. तरीही आपला प्रवास मात्र हा फक्त आपल्याबरोबर एकट्यानेच सुरू असतो. असे असतांना

एकटेपणाने आयुष्य वेढले Read More »

एक स्वस्थ झोप आणि मानसिक आरोग्य

 आपल्याला झोप येणे ही आपल्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या प्रमाणेच पशू पक्षीही झोपत असतात. आपण अंगमेहनत करून किंवा मानसिकरीत्या थकलो कि आपल्याला आपोआपच झोप लागते. एक शांत झोप घेतल्यानंतर आपल्याला ताजेतवाने व स्फूर्तीदायक वाटू लागते. तसेच पुन्हा मेहनत करण्याचा उत्साह आपल्यात संचारतो. कारण शांत झोप घेतल्यामुळे केवळ आपल्या शरीरासच आराम मिळत नाही. तर आपल्या

एक स्वस्थ झोप आणि मानसिक आरोग्य Read More »

तरूणाईचे मानसिक स्वास्थ्य

आजच्या परिस्थितीत कित्येक घरांमध्ये तरुण मुलांना आपली कारकीर्द निवडण्याची संधी दिली जात नाही. त्याचबरोबर आई वडीलांचा जास्तीत जास्त रोख मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियर बनविण्याकडे असतो. आपल्या मुलांच्या जीवनातील एवढा महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना ते केवळ आपल्या आर्थिक क्षमतांचा, आपल्या इच्छेचा व आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचा विचार प्राथामिकतेवर ठेवत असतात. परंतू ते करत असतांना मुलांच्या क्षमतांना व

तरूणाईचे मानसिक स्वास्थ्य Read More »

आई वडीलांमधील नाते मुलांवर कसे परिणाम करते

        आपल्या सर्वांच्या आयुष्यात जन्मदात्यांना सर्वोच्च मानाचे स्थान असते. त्याचप्रमाणे आपल्या हातून जन्मदात्यांची सेवा घडणे हेही सर्वात पुण्याचे कार्य असते. कारण जन्मदात्यांनी त्यांच्या सहजीवनात एकत्र येवून घेतलेल्या निर्णयातूनच आपल्याला ह्या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभलेले असते. आई वडीलांच्या हृदयातही आपल्या मुलांसाठी निस्वार्थ भाव असतो. त्यामुळेच त्यांना आपल्या मुलांचे रंगरूप व बाललीला बघून

आई वडीलांमधील नाते मुलांवर कसे परिणाम करते Read More »