
कधी कधी आपल्या आयुष्यात खुप उलथा पालथ चाललेली असते. आपण काय केल्यास परिस्थितीत बदल येवू शकतो हे कळण्यासही मार्ग नसतो. आपले आयुष्य एखाद्या चक्रव्युव्हात फसल्यासारखे वाटते. आपल्या डोक्यात विचारांची गुंतागुंत चाललेली असते. सगळेच अर्थशुन्य झाल्यासारखे वाटते. दिवसा अखेरीस आपल्याला काही निष्पन्न होईल. ह्यावीषयी खात्री वाटत नाही. आपण आपल्या मनातील नकारात्मक विचारांना मुठमाती देण्यासाठी संघर्ष करीत असतो. स्वत:बद्दल काही चांगले किंवा सकारात्मक बोलण्यासाठी आपण आसुसले असतो. परंतू ते करण्यास हतबल असतो. कारण आपण अपयशी असल्याची भावना आपल्या मनात खोलवर रुजत गेलेली असते.
आपल्या मनात आशा जागविणे एवढे सोपे नसते. कधी कधी आशा ठेवणेच आपल्या नैराश्याचे कारण ठरू शकते. आपल्या आसपासची माणसे आपले प्रियजन मित्रमंडळी आपल्याला समजण्यात कमी पडतात. आपल्या बद्दल अनेक प्रश्न त्यांच्या मनात जन्म घेतात. आपण आपल्या कामात रमावे, स्वत:ची काळजी घ्यावी अशी त्यांची मनोमन इच्छा असते. आपल्याला मानसिक वेदना देणार्यांना सोडून आपण नवीन लोकांशी नव्याने संबंध स्थापीत करावे असे त्यांना वाटते. परंतू जेव्हा आपण नैराश्याच्या पुढे हात टेकतो तेव्हा आपल्याला कोठेही उमेद दिसत नाही.
कारण आपले विचारच आपल्यातील शक्ती कमी करण्यास कारणीभूत असतात. आपल्याला कुठूनही चालना मिळत नाही. स्वत:मध्ये काही बदल करण्याची इच्छा असूनही हिंमत जुटवता येत नाही. कारण आपल्या मनामध्ये अनेक गोष्टींची भिती दडलेली असते. जसे कोणाच्या नकाराची भिती, एकटे पडण्याची भिती, मरणाची भिती अशाप्रकारे निराशेची भावना आपल्याला पुर्णपणे ग्रासून टाकते. अपयश येण्याची भिती आपल्याला प्रयत्न करण्यास धजावूच देत नाही. परंतू आपल्या मनाच्या अशा वाईट परिस्थितीतून जात असतांना आपण खुप मोठा तसेच दुरचा विचार न करता आपल्या दैनंदिन जीवनातील लहान सहान सवयीत बदल आणणे, सकारात्मक विचारांना बढावा देण्याची जास्त आवश्यकता असते.
1. धाडस
निराशेच्या दरीतून बाहेर येण्यासाठी नुसती आपली इच्छा असून भागत नाही. तर त्यासाठी धाडस जुटवीण्याची गरज असते. धाड्साने पावले उचलावी लागतात. त्याचप्रमाणे नव-नवीन योजनांची आखणी करावी लागते. जेणेकरून आपला स्वत:वरचा आत्मविश्वास वाढू लागेल. त्याचप्रमाणे आपण कोणत्याही योजनेसंबंधीत प्रत्येक गोष्ट लिहून ठेवण्याची सवय स्वत:ला लावली पाहिजे. ज्यामुळे योजनेची अंमलबजावणी होण्या अगोदरच त्याविषयीचा हुरूप आपल्यात संचारू लागेल. तसेच आपल्या नकळतपणे आपण पुन्हा एकदा क्रियाशील होवू.
2. आदर्श व्यक्तीमत्व
आपल्या प्रमाणेच अनेक लोक निराशेचा सामना करत असतात. परंतू फार कमी त्यावर विजय मिळवून मनात आशेचा दिप प्रज्वलीत करतात. ज्यांनी हे धाडसी कृत्य त्यांच्या जीवनात केलेले असते. ते इतरांसाठी आदर्श व्यक्तीमत्व बनतात. तेव्हा त्यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील रहावे. पुस्तकातून तसेच वर्तमानपत्रातून त्यांच्या गौरवगाथा आपल्या वाचनात आणाव्यात. त्यामुळे आपल्या मनातही आशा जागृत होईल.
3. सकारात्मक राहणे
आपण स्वत: मधील अद्वीतीय गुणांविषयी वारंवार स्वत:ला आठवण देणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपण भुतकाळात मिळवलेल्या यशाचीही आठवण ठेवावी. जेणेकरून आपल्यातील उर्जा जास्त काळ टिकून राहील. त्याचप्रमाणे अशी कृत्ये करावीत ज्यामुळे आपल्या मनात आशेचा किरण चमकू लागेल. नकारात्मक गोष्टी ज्या आपले मनोबल कमी करतात त्यांच्यावर पाय ठेवून ताठ मानेने उभे रहावे. त्यामुळे आपला आत्मवीश्वास वाढेल. आणि कधितरी त्यांच्यावर मात करणे आपल्याला नक्कीच शक्य होईल.
4. स्वत:ची मदत स्वत:च करावी.
जेव्हा आपल्याला कोणीही समजून घेत नाही. आपल्याबद्दल मत बनवीतात. अशावेळी त्यांच्या जागेवर जावून त्यांनाच आपण समजून घ्यावे. त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करावी. तसे केल्याने आपल्या नजरेत स्वत:बद्दल सन्मान वाढेल. स्वत:चे कौतुक करावेसे वाटेल. आत्मप्रेम जागृत होईल. तसेच हे आत्मप्रेम आपल्यातील आशेला जिवंत ठेवेल.
5. जागृकता आणावी.
आपल्या डोक्यात चाललेल्या विचारांवर लक्ष केंद्रीत करावे. कारण त्यामुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. आपला आत्मसंवाद नकारात्मक असल्यास त्यास बदलणे गरजेचे असते. त्यासोबत आत्मकेंद्रीत होवून आपल्या अस्सल व्यक्तीमत्वाचा स्विकार करावा. आपल्या व्यक्तीमत्वातील उणीवान्ना आपल्या विशेषता समजून त्यांच्यात आणखी सुधारणा आणाव्यात. त्यामुळे आशेला पालवी फुटण्यास सुरवात होईल.
6. निसर्गाकडून शिकावे
निसर्गनियमांप्रमाणे हंगाम बदलतात. त्यानुसार वृक्ष वेलींमध्ये बरेच बदल घडतात. झाडांची सर्व पाने पिवळी पडून गळून पडतात. म्हणून झाड निराश होत नाही. ते हंगाम बदलण्याची वाट बघतात. संयम राखतात. हे कधिही न संपणारे चक्र आहे. परंतू आपण त्यास सकारात्मक नजरेने बघण्याची गरज आहे. त्या चक्रानुसार झाडांना पुन्हा पालवी फुटते. आणि झाड पुन्हा हिरवेगार होते.
जसे दिवस उगवीण्यापुर्वीची रात्र जास्त काळोखी असते. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या आयुष्यात मोठे बदल येणार असतात. तेव्हा आपले आयुष्य समस्यांनी भरलेले असते. आपण त्या समस्यांमध्ये गुरफटून जातो. परंतू त्या समस्यांपलिकडे असलेला आशेचा किरण आपण बघू शकत नाही. कारण आपल्याकडे तेवढी दुरदृष्टी नसते. समस्या ह्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. परंतू त्यांच्यात जीवनास थोपवीण्याची ताकद नसते. मनात आशेचा दिप प्रज्वलीत करून ती दुरदृष्टी आपल्यात आणता येवू शकते. म्हणून नैराश्याला आपला बळी घेवू देवू नये. काहीही झाले तरीही आपल्यातील आशेला जीवंत ठेवावे.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)