मानसिक वेदनांना लगाम लावा

वेदना ह्या मानसिक असो अथवा शारिरीक त्यांना सहन करणे सोपी गोष्ट नाही. शारिरीक वेदना निदर्शनात येतात. त्यांची सुषृशा करणे ही सोपे असते. परंतू मानसिक वेदनांचे तसे नसते. त्या आतल्या आत आपल्या मनाला पोखरतात. मनाच्या आत वादळ उठलेले असते. परंतू ते आपल्या व्यतिरीक्त कोणालाही दिसत नाही. सतत मनात चाललेला संघर्ष इतरांच्या समजन्या पलिकडचा असतो. त्रास होतोय हे कळून सुद्धा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपण त्याला महत्वाचे समजत नाही.

     भावनांच्या लहरींना आपण थोपवू शकत नाही. त्यांच्या आवेगात आपण खोलवर ओढत चाललोय. हे समजत असूनही आपण काहिही करू शकत नाही. आपल्याला मानसिक शांततेची नितांत गरज असते. आणि आपल्याला हे ही कळते.कि काय केल्याने आपल्याला मानसिक शांतता लाभू शकते, तरीसुद्धा त्या मार्गावर चालण्याची आपली हिंमत होत नाही. कारण आपल्याला हे माहित असते कि तसे केल्याने आपण एकटे पडू. आपल्या मनात शंकांचे थैमान उठते. ह्यापुर्वी हा मार्ग कोणी अवलंबीला असेल का? असा प्रश्न मनात घोंगावत असतो. आणि त्यामुळे आपण किनार्‍यावर येण्या ऐवजी पुन्हा वेदनांच्या समुद्रात खोलवर जातो. कधि कधि तर आपल्याला मानसिक त्रासाची इतकी सवय होते. कि त्या अवस्थेत आपल्याला आरामदायक वाटू लागते. कारण त्यातून बाहेर पडन्यासाठी लागणारे कष्ट आपल्याला जास्त कठीण वाटतात. वेदनांनाच आपण आपले जीवन समजू लागतो. आणि त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाही. तेव्हा अखेरीस आपण त्यात बुडणार हे ठरलेलेच असते. परंतू जर किनार्‍या वरील शांततेस मिठी मारायची इच्छा असेल. तर वेदनांना पार करण्याचे धाडस करावेच लागते.

1. जिवलग मित्रांचे सहकार्य घ्यावे.

     जेव्हा आपण एकटेच आपल्या मानसिक वेदनांशी झुंज देत असतो. तेव्हा आपल्या प्रियजनांना आपल्याला होणारा त्रास बघवत नाही. ते आपल्याला त्या परिस्थितीतून काढण्यासाठी धडपडत असतात. किंबहूना ते मदतीचा हातही पुढे करतात. आपल्या त्रासाला बघून ते रडतात. कारण त्यांचे आपल्यावर विनाअट प्रेम असते. अशा एखाद्या जिवलग मित्राकडे आपले मन मोकळे करावे. आपल्याला होणार्‍या त्रासाची त्याला कल्पना द्यावी. त्याच्या सहकार्याने वेदनांना पार करणे सोपे होवू शकते.

2. स्वत:बद्दलचे गैरसमज दूर करावे.

    मानसिक वेदनांमधे आपण बर्‍याच मोठ्या काळापासून खितपत पडलेलो असतो. त्यांच्याशी  झुंज देतांना आपल्याला त्यांची सवय होवून जाते. मनशांतीचा आपल्याला विसर पडत जातो. वेदनांना आपल्या जीवनाचा भाग समजतो. आणि आपण त्यांचा स्विकार केलेला असतो. तसेच सर्वस्वी त्यांच्या आपल्या जीवनात असण्याला स्वत:लाच जबाबदार ठरवत असतो. पण असे करणे योग्य नाही. त्यापेक्षा स्वत:वर विश्वास ठेवावा . आणि वेदनांमधून वाट  काढत किनार्‍या कडे पोहोचन्यासाठी चालू लागावे.

3. आपले धाडस इतरांसाठी प्रेरणा ठरू शकेल.

   नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे कि अशा परिस्थितीला तोंड देणारे फक्त आपणच नाही. अनेक लोक आजही वेगवेगळ्या मानसिक वेदना देणार्‍या अवस्थेतून बाहेर निघण्यासाठी जीवाची तगमग करत आहेत. आपण मानसिक वेदनांमधून बाहेर पडण्यासाठी केलेले धाडस अनेकांचे मनोबल वाढविण्यास मदत करणारे ठरू शकते. आपल्या मनाला काहीतरी बोचत आहे.  हे कळूनही त्यात खितपत पडून राहणे.  तसेच बाहेर निघण्याचा प्रयत्न न करणे.  हे आपल्या दु:खाचे खरे कारण असते. आपण उचललेले एक धाडसी पाऊल कित्येक लोकांना प्रेरणा देण्यास कारणीभूत असते. तसेच त्यांच्या जीवनाला सकारात्मक वळण लावणारे देखील असते.

4. स्वत:वर विश्वास ठेवून हे युद्ध जिंकावे

   मानसिक वेदना ह्या आपल्यासाठी कधिही आरामदायक ठरू शकत नाहीत. हे लक्षात ठेवले पाहिजे. तेव्हा ह्यापुढे त्यात बुडन्यापासून स्वत:ला वाचवणेच योग्य ठरेल. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीला सकारात्मक नजरेने बघण्याची स्वत:ला सवय लावली पाहिजे. सकारात्मक उर्जा स्वत:मधे भरून किनार्‍यावरील मानसिक शांतीकडे जावे. ही आपली नवी सुरवात असू शकेल.

    आपल्याला आनंदी राहन्यासाठी नियमीतपणे काहितरी नविन घडण्याची गरज भासते. परंतू एकही वाईट घटना आपल्याला आयुष्यभर दु:खी राहण्यासाठी कारणीभूत ठरते. असे होण्याच्या मागचे कारण एकच  असते. आपण आपल्या आयुष्यात सुखाच्या क्षणांना सहज सोडून देतो. परंतू दु:खाला मात्र घट्ट पकडून ठेवतो. आणि आयुष्यभर मानसिक वेदनांच्या जाळ्यात अडकून पडतो. तेव्हा सुखाच्या क्षणांना मनसोक्त जगण्याची सवय लावावी तरच आपला जीवनानुभव सुखद व आल्हाददायक होवू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *