
स्त्रियांना सृष्टीने विशेष घड्विले आहे. त्याचप्रमाणे त्यांना खास नैसर्गिक जबाबदार्या देवून गौरविले सुद्धा आहे. तसेच सृष्टीला हे सुद्धा माहित होते की तिने ज्या जबाबदार्या स्त्रियांवर सोपविल्या आहेत त्यांना स्वबळावर पेलतांना स्त्रियांना मानसिक तसेच शारिरीक वेदनाही होणार आहेत. म्हणूनच त्या त्रासाला किंवा वेदनांना सहन करण्याची आंतरिक ताकद सुद्धा सृष्टीने स्त्रियांना बहाल केली आहे. तेव्हा प्रत्येक स्त्री ही स्त्रीशक्तीच्या व स्त्रीत्वाच्या गुणविशेशांनी संपन्न आहे. परंतू एका कस्तुरी मृगासारखी स्त्रीही आजीवन स्वत:मधील अंतर्गत कणखरतेपासून अपरिचित राहते. त्यामुळेच स्त्रियांना शक्तीचे स्वरूप म्हणून का ओळखले जाते ह्या महत्वपूर्ण गोष्टीला त्या आत्मविश्वासाने कधीही पडताळून पाहत नाहीत.
स्त्रिचे प्रत्येक रूप सुंदर व विलोभणीय आहे. तिच्या एकटीचे असणे म्हणजे हजारो पक्ष्यांचा किलबिलाट असतो. तिचे सोबत म्हणजे ममतेचे झोपाळे असतात. तिचे हसणे म्हणजे सुखाची ग्वाही असते. ती बुद्धी आहे. ती भावना आहे. ती गती आहे. ती रचना आहे. ती आभा आहे. ती आपल्या संस्कृतीचा पवित्र ध्वज आहे. ती मनुष्यरूपी गलबतास स्थिर करणारा किनारा आहे. स्त्रिचे मांगल्य आपल्याला वैभवा कडे घेवून जाते. स्त्रिचा सन्मान आपल्याला कर्तव्यपूर्तीच्या शिखरावर नेवून ठेवतो. स्त्रिचे अस्तित्व घरादारास चैतन्य प्राप्त करून देते.
फार पूर्वीच्या काळापासून लोक वेगवेगळ्या देव्यांची पुजा करतांना दिसतात. त्यांना माता म्हणून संबोधतात. परंतू त्याच देवीचे जीवंत रूप म्हणजे आपल्या घरातील आई बहिण बायको मुलगी अशा सर्व स्वरूपात स्त्रिया आपल्या आसपास वावरत असतात. आपल्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. त्यांचा मात्र पदोपदी अपमान व अवमान केल्या जातो. त्यांच्यावर अवाजवी बंधने लादली जातात. त्यांना एखाद्द्या निर्जीव वस्तूप्रमाणे वागणूक दिली जाते. पूर्वीच्या काळात शत्रूने एखाद्द्या स्त्रिला पळ्वून नेले. तर तिचा काहि दोष नसतांना तिला अपमानास्पद वागणूक दिली जात असे. ज्यामुळे तिच्या समोर विहीर जवळ करण्यावाचून कुठलाही पर्याय नसायचा. त्याचबरोबर एखादी स्त्रि वंशाचा दिवा देण्यास सक्षम नसेल तर तिच्या जीवनाला काहिही अर्थ उरत नसे. नवरा गेल्यावर त्याच्या जळत्या चितेवर त्या स्त्रिला ढकलून देण्यात येत असे. वडिलांच्या वयाच्या माणसाशी लहान लहान मुलींची लग्ने लावून देण्यात येत असत. लहान वयात आलेले विधवेचे जीवन तर त्या स्त्रि साठी नरकाहून वाईट असायचे. स्त्रियांना नरकयातना देणार्या ह्या सर्व चालिरिती आता अस्तित्वात नाहित. कारण स्त्रिवर अन्याय करणे म्हणजे तिचे वात्सल्य पायदळी तुडवणे. हे थोर समाजसुधारकांच्या लक्षात आले आणि त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून वाईट चालिरिती मोडून काढ्ल्या.
तरिही आजच्या काळातही स्त्रियांच्या वेदना कमी झालेल्या नाहित.
जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने महत्वाकांक्षी स्त्रियांचा गौरव केल्या जातो. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. परंतू तरिही स्त्रियांच्या वेदनांकडे मात्र अगदी सहजपणे कानाडोळा करता येत नाही. पुरूषांच्या खांद्द्याला खांद्दा लावून पुढे सरसावणार्या स्त्रियांची होणारी दमछाक कोणालाही दिसत नाही. दमछाक तर होणारच कारण अशावेळी त्यांना घरासोबत त्यांची कारकीर्द अशा दोन आघाड्या सांभाळाव्या लागतात. स्त्रि ही क्षणाची पत्नी, अनंत काळाची माता असते. तरिसुद्धा आयुष्यभर ती पुरूषी अहंकाराला बळी पडत असते. ज्या स्त्रिया गृहिणीचे जीवन जगत आहेत. त्यांना आणि त्यांच्या कामांना महत्व दिले जात नाही. ज्या मुली किंवा स्त्रिया शिक्षण आणि नोकर्यांसाठी घराबाहेर पडतात. त्यांना विक्षीप्त पुरूषांच्या वाईट आणि विकृत नजरांचा सामना करावा लागतो. कुमारिका ते वृद्ध महिलांपर्यंत घडणार्या बलात्काराच्या घटना आपण बातम्यांमधून किंवा वृत्तपत्रांमधून वाचतो. भररस्त्यात मुलींच्या अंगावर पेट्रोल ओतुन जाळण्याच्या तसेच अॅसीड फेकण्याच्या दुर्दैवी घटना नियमीतपणे आपल्या आसपास घडत असतात. हुंडाबळी सारख्या दुर्दैवी घटना अजूनही निष्पाप मुलींचा बळी घेत आहेत. तसेच आईच्या गर्भातच मुलगी आहे म्हणून भ्रुणहत्येसारख्या गोष्टी जगाच्या कानाकोपर्यात दररोज घडत आहेत. त्यासोबत समाजाने स्त्रियांवर लादलेले बंधनकारक जीवन ह्या सगळ्याचा सामना आजचीही स्त्रि नेटाने करीत आहे. परंतू आता ती त्या भीतीने थांबलेली नाही.
तरिही स्त्रिया प्रगतीपथावर चालत आहेत. म्हणूनच आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे कि प्रत्येक स्त्रि शक्तीचे रूप असते. तेव्हा ज्याठिकाणी स्त्रिवर अत्याचार होतो व तिची निर्भत्सना होते. ते घर किंवा ते साम्राज्य लयास जाते. स्त्रियांवर अत्याचार करणे म्हणजे त्यांचे मांगल्य झुगारणे, त्याचा अपमान करणे असा त्याचा अर्थ होतो. त्याला पाप म्हणतात. पर स्त्रि ही मातेसमान असते. तेव्हा तिच्यासाठी मनात आदर ठेवून वागन्यातच सभ्यता आहे. आणि ही सभ्यता पाळण्यातच संस्कृतीचा सम्मान आहे.
1. पुरूषांनी स्त्रियांच्या त्यांच्यावरच्या जबाबदार्यांना आपले कर्तव्य समजावे
आपण बघतो की, ज्या स्त्रिया पैसे कमविण्यासाठी काहिही करत नाहित. फक्त घरातील जबाबदार्या पार पाडतात. बर्याचदा त्यांच्या त्या कामाला महत्व दिल्या जात नाही. त्यांना गृहीत धरले जाते. तसेच त्या सर्वात जास्त पुरूषी अहंकारास बळी पडतात. कारण त्या कशा काही करत नाही आणि त्यांचे जीवन दुसर्यांवर विसंबून आहे हे वेळोवेळी वेगवेगळ्या तर्हेने र्त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या जाते. त्यांना घरात महत्व देण्यात येत नाही. परंतू पुरूषांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की स्त्रिया जे करू शकतात ते पुरूष करू शकत नाहीत. त्यांच्या केवळ घरात असण्यालाही अर्थ प्राप्त आहे. त्यांच्याशिवाय घराची कल्पनाही करणे शक्य नाही. म्हणून त्यांंची घरातील भागीदारी मनापासून स्विकारली पाहिजे. त्यांच्यावर अवाजवी हक्क न दाखविता त्यांच्या क्षेत्राचा आदर ठेवन्यात आला पाहिजे. जर त्या पुरूषांवर अवलंबून आहेत. तर पुरूषांनी ते आपले अहोभाग्य मानले पाहिजे ओझे नाही. तसेच त्यांच्या भावना न दुखवीता आपल्या त्यांच्या प्रती असलेल्या जबाबदार्या आनंदाने पार पाडल्या पाहिजे.
2. पुरूषांनी स्वत:ची प्रगती करावी
प्रत्येक स्त्रिची ही इच्छा असते. की तिच्याशी जुळलेल्या पुरूषाने सर्व दृष्टीकोनातून प्रगती करावी. त्यासाठी त्या सर्वार्थाने प्रयत्न करत असतात. पुरुषाच्या पाठीमागे पडद्यामागची भूमिका निभावण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचतात. स्वत: मधील कलाकौशल्यांकडे दुर्लक्ष करून पुरूषांच्या प्रगतीकडे लक्षकेंद्रीत करतात. कारण स्त्रियांना कर्तव्यदक्ष पुरूष आवडतात. पुरूषांनिही स्त्रियांच्या भावनांचा आदर ठेवला पाहिजे. तसेच समाजात स्वत:ला नावलौकिक मिळवीण्यासाठी झटले पाहिजे. विनम्रतेने कुटूंबाचे नेतृत्व केले पाहिजे. समाजाप्रती सेवाभाव ठेवला पाहिजे. त्यामुळे स्त्रियांच्या मनात पुरूषाविषयी आदर निर्माण होतो. त्याशिवाय त्यांच्या मनातही जीवनात काही करून दाखवीण्याचे धाडस निर्माण होते. त्याही स्वत:ची सर्वांगीण प्रगती करून आपला आत्मविश्वास वाढवितात.
3. स्त्रियांना आपला जिवलग मित्र समजावे.
स्त्रियांना नेहमी नात्यांच्या बंधनात अडकविण्यात येते. त्यामुळे त्या नात्यांना महत्व देण्यासाठी कायम सज्ज असतात. त्यांच्या कृतीतून नेहमी कोणत्या ना कोणत्या भूमिकेच्या जबाबदारीचेच प्रतिनिधीत्व होत असते. जे त्यांच्याकडून भरमसाठ अपेक्षांच्या पूर्ततेची इच्छा बाळगत असते. परंतू त्यांना जर आपण सखी मानले. तर वेळोवेळी त्या आपल्याला मोलाचे सल्ले देतात. संकटाच्या वेळी नेटाने आपल्या बरोबर असतात. जेव्हा एक आई आपल्या मुलाला सल्ला देते. तेव्हा ती आपल्या वयापेक्षा मोठी असलेली आपली मैत्रिण असते. तर जेव्हा ती पत्नीच्या नात्याने आपल्या पतीला योग्य सल्ला देते. तेव्हा ती जीवनसंगिनी असते. म्हणून आपल्या घरात ज्या स्त्रिया आहेत. त्यांना आपल्या मैत्रिणी बनवावे. तसेच त्यांच्याशी असलेल्या आपल्या नात्याला आणखी उच्च दर्जा प्राप्त करून द्द्यावा.
4. स्त्रियांचा नेहमीच आदर करावा
मुलांच्या मनावर लहान वयातच स्त्रियांचा आदर करण्याचे संस्कार बिंबवावे. स्त्रियांच्या घरातील कामाचे महत्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला असायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यावर विसंबून राहण्यापेक्षा त्यांना मदत करण्यासाठी हात पुढे करावा. त्यांच्या भावनांचा व त्यांच्या क्षेत्राचा नेहमी सम्मान ठेवावा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी. तसेच त्यांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्त्रियांना आपल्या डोक्यावरची ओझी नाही. तर आपल्या जीवनातील लक्ष्मीचे स्वरूप समजावे. स्त्रिया आपल्यावर नाही तर आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे. कारण त्यांच्या सकारात्मक विचारांच्या जोडिशिवाय आपण एक पाउलही पुढे टाकू शकत नाही. म्हणून आपल्या घरातील स्त्रिया सर्वतोपरी आनंदी राहतील, ही आपली प्रबळ इच्छा असली पाहिजे. तसेच त्यांना आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य असले पाहिजे.
5. स्त्रियांंचे घरातील पुरूषांशी विश्वसनीय नाते असावे.
आजच्या स्त्रिया घरात तसेच घराबाहेरही आघाड्या मारत आहेत. हे करणे त्यांच्यासाठी दिसते तेवढे सोपे नाही. त्यासाठी त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांच्या मनात अनेक विषयांवरून सतत घालमेल चाललेली असते. घरातील पुरूष मंडळींनी पुढाकार घेवून स्त्रियांचा विश्वास जिंकल्यास अनेक क्लीष्ट विषय त्या उलगडून बोलू शकतील. स्त्रियांना घरातील पुरूषांचे पाठबळ लाभल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास द्वीगुणीत होईल. त्या त्यांच्या समस्या मोकळेपणाने उघडकीस आणू शकतील. असे केल्याने त्यांना होणार्या त्रासालाही वाचा फुटेल, त्याचबरोबर त्यांचे प्रश्नही सुटतील.
स्त्रियांचे आपल्या आयुष्यात असणे आनंद देणारे आहे. त्याचप्रमाणे त्यांचे प्रेम, राग, लोभ ह्यामागे अत्यंत सखोल अर्थ असतो. तो अर्थ ज्याला कळला तो त्याच्या जीवनात प्रगतीपथावर चालू लागतो. परंतू जे पुरूष आपल्यातील अहंकाराने स्त्रियांवर मात करण्यास निघतात. ते स्वत:चेच मोठे नुकसान करत असतात. कारण स्त्रियांच्या आशीर्वादाच्या साथीशिवाय त्यांच्या जीवनाला सुरक्षित ठेवणारे कवच अबाधित राहत नाही. त्यामुळे स्त्रियांशिवाय जगण्याची कल्पनाही करणे दुर्भर आहे. त्यांचे आपल्या आयुष्यात नसणे दु:खात लोटणारे आहे. हे जेव्हा पृथ्वीतलावरील प्रत्येकाला कळेल. तेव्हा खर्या अर्थाने देशाची प्रगती होईल.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)