
‘स्त्रि जन्मा ही तुझी कहानी’ हे वाक्य प्रत्येक स्त्रिच्या आयुष्याला अधोरेखित करते. कारण प्रत्येक स्त्रिची एक निराळी व अनोखी गोष्ट असते. प्रत्येकीला तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या मोर्च्यावर लढा द्द्यावा लागतो. कारण स्त्रियांचे आयुष्य केवळ त्यांच्यापुरते सीमित नसते. तर निसर्गानेच त्यांना काही जबाबदाऱ्या सोपविलेल्या असतात. तसतसे प्रत्येक स्त्रीचे आयुष्य वळण घेत जाते. त्याचप्रमाणे स्त्रिया ते स्वीकारण्यास स्वत:ला समर्थ बनवत जातात. स्त्रियांच्या आयुष्यात तक्रारींना किंचितही जागा नसते. अशाप्रकारे त्या खडतर जीवनप्रवासालाही आपल्या समर्पकतेने सहज व सोपा बनवत पुढे पुढे चालत राहतात. ज्यामुळे आयुष्य एखाद्या चळवळीचे स्वरूप धारण करते. ज्यात सोबत असलेल्यांपैकी प्रत्येकाला जोश येतो. जर एक स्त्री आपल्या उर्जेने सर्वकाही परिवर्तीत करू शकते. तर तिची उर्जा सकारात्मक व्हावी ह्याकरीता निसर्गही कायम प्रयत्नशील असतो. हाच स्त्रियांच्या जीवनाचा संघर्ष असतो. ज्यामधून तावून सुलाखून निघून एक स्त्री विलक्षण होत जाते. तिचे ते विलक्षण होणे तिला आपले आयुष्य सार्थक करण्यास खुणावत असते. अशारितीने एक स्त्री स्वत:चे आयुष्य घडवीन्याकारीता स्वत:मध्येच परिपूर्ण असते.
प्रत्येक स्त्रिचे वेगळे वैशिष्ट्य असते आणि त्या कला गुणांनी तसेच अनंत सम्भावनांनी समृद्ध असतात. परंतू जेव्हा त्या घरासाठी आपल्या स्वप्नांचा व स्वत्वाचा त्याग करतात. तेव्हा मात्र कुटूंबिय त्यांना कमकुवत समजू लागतात. कारण त्यांचा असा समज असतो कि त्यांना आणखी काही करणे जमत नाही म्हणून त्या घरातच असतात. परंतू त्यांच्यातील हुशारी आणि चातुर्य मात्र कदापि लपत नाही. कारण घर सांभाळणे ही देखील एक कला आहे. तेव्हा त्या आपले चातुर्य घरात वापरतात. त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्याचे वळण घेणे ठरलेले असेल तर मात्र आपोआपच त्या दिशेने त्यांचे विचार मार्गही शोधू लागतात.
स्त्रिया एकावेळी अनेक कामांना न्याय देवू शकतात ही त्यांची विशेषता असते. परंतू त्यांचे हेच कौशल्य त्यांना यंत्रासारखे बनवत चालले आहे. कारण त्या कधीही डोक्याने शांत व मनाने समाधानी होत नाहीत. कोणत्याही गोष्टीत आणखी कशाची भर घातली म्हणजे ती परिपूर्ण होईल ह्याच विचाराने त्या नेहमी क्रियाशील असतात. त्याचबरोबर स्त्रिया ह्या भावनाप्रदान असतात. त्यामुळे घरातील माणसांच्या आवडी निवडी जपणे. त्यांची मनापासून काळजी घेणे. त्यांची मनं मोकळी करणे. त्यांचे आनंदाचे क्षण साजरे करणे. त्यांच्या मनात विश्वास भरणे. त्यांना मोलाचे सल्ले देणे आणि वेळ पडल्यास त्यांच्यासाठी स्वत:कडे कमीपणा घेणे ही कामे मनापासून करून त्या घरातील माणसांना आपसात जोडून ठेवतात. त्यामुळे त्यांच्या ह्या समर्पित योगदानाने घराचा पाया भक्कम राहतो. अशाप्रकारे स्त्रिया सर्वांच्या सुखात सुख मानतात आणि त्यांना हेच त्यांचे जीवन वाटते.
स्त्रिया आपले संपुर्ण जीवन आपल्या माणसांसाठी समर्पीत करतात. ज्यामुळे त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याकडे मात्र दुर्लक्ष करत जातात. स्वत:साठी वेळ काढणे त्यांना महत्वाचे वाटत नाही. कारण तसे करणे म्हणजे त्यांच्या दृष्टीकोनातून स्वार्थीपणा असतो. अशावेळी मात्र त्यांच्यातील कर्तुत्ववान स्त्रिस वाव मिळत नाही. ज्यामुळे ती मागे पडत जाते. कारण जग काळासोबत बदलत चालले आहे. जर स्त्रियांनी काळासोबत स्वत:मध्ये परिवर्तन आणले नाही. तर जग त्यांना मागे टाकून पुढे निघूण जाते.
घरातून स्त्रियांना पुरेसे प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे त्या त्यांच्या सामान्य दिनचर्येत पुर्णपणे गुंतून जातात. कधि त्यांच्या अंतर्मनाने त्यांच्यातील कर्तुत्ववान स्त्रिस साद घालून जागृत करण्याचा प्रयत्न केला. तरी काळानुसार मागे पडल्यामुळे त्यांना स्वत:साठी कमीपणा वाटत असतो. त्याशिवाय तुलनात्मक विचार करून त्यांच्या मनाची जटील अवस्था होते. तसेच त्यांना स्वत:मध्ये आत्मविश्वासाची त्रुटी जाणवू लागते. त्यामुळे काहिही नविन करण्याची सुरवात करण्यासाठी त्या मनातून घाबरतात. अशावेळी त्यांच्या वर आलेली आणीबाणीची परिस्थीती किंवा त्यांच्यातील महत्वाकांक्षी स्त्रिच त्यांना स्वत:चे आयुष्य सावरण्यासाठी पुढे सरसावण्यास प्रोत्साहीत करू शकते.
स्त्रियांनी फक्त स्वत:शी पक्का निर्धार करण्याची गरज असते. तेव्हाच त्यांना त्या दृष्टीकोणातून मार्गदर्शन करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्द्ध होवू शकतात. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या जीवनास कोणत्याही निरर्थक कारणाने व्यर्थ जावू देवू नये. कारण त्यांनी स्वत:साठी उचललेले भक्कम पाऊलच अनेकांच्या मनास उभारी देण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यांचे कालच्या तुलनेत आज अधिक चांगले होत जाणे, कौशल्यवान होत जाणे त्यांच्या भविष्यात होणार्या प्रगतीवर शिक्का उमटवत जाते.
स्त्रिया शक्ती स्वरूप असतात. म्हणूनच निसर्गाने त्यांना एका नविन जीवनास आपल्या शरिरात रुजवून, त्यास जन्मास घालून त्याला मोठे करण्याचे श्रेष्ठ कार्य सोपविले आहे. परंतू स्त्रियांच्या अंगी असलेल्या जन्मजात सामर्थ्याचा त्यांना स्वत:लाही अंदाज नसतो. म्हणूनच त्या स्वत:ला कमकुवत समजतात. तर कधि स्त्रियाच स्त्रियांच्या प्रगतीत बाधा आणतात. तेव्हा प्रत्येक पुरूषाचे हे कर्तव्य आहे कि त्यांच्या आयुष्यातील स्त्रियांना फक्त घरातील जबाबदार्यांमधे गुंतवून न ठेवता त्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव द्यावा. त्यांना आर्थिकदृष्टीने सक्षम बनविण्याचा ध्यास घ्यावा. कारण स्त्रिया कर्तुत्वाच्या दृष्टीने अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू असतात. तेव्हा त्यांच्या क्षमतांवर पुरूषांनी कधिही शंका घेवू नये. त्यापेक्षा प्रत्येक यशस्वी स्त्रिच्या मागे एक पुरूष असावा. कारण बदलत्या काळाबरोबर पुरूषांचा हा पुढारलेला दृष्टीकोणच स्त्रियांचा सम्मान करण्यास पुरेसा आहे.
1. स्त्रियांनी महत्वाकांक्षी लोकांच्या संगतीत रहावे.
स्त्रिया मुळातच महत्वाकांक्षी असतात. आपल्या घरासाठी एकेका रुपयाची बचत करण्यापासून ते पैसा कमविण्यासाठी आपली कर्तव्ये सांभाळून घराबाहेर पडणार्या स्त्रिया आपले कर्तुत्ववान असणे सिद्ध करतात. परंतू ह्याच भावनाशील स्त्रिया कुटूंबियांवरच्या त्यांच्या प्रेमास आपल्या व्यक्तीगत प्रगतीच्या मार्गात मात्र स्वखुशीने पायगुंता होवू देतात.
बर्याचदा त्या आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आपली कारकीर्द पणास लावतात. त्या त्यांच्या जीवनात कुटूंबियांनाच प्राथमिकता देतात. असे असतांना त्यांना दैनंदीन जीवनात स्वत:चे व्यक्तीगत आयुष्य घडविण्याचे प्रोत्साहन देणारी संगत लाभत नाही. त्यांच्यातील वैशिष्ट्यांना वाखाणले जात नाही. जर स्त्रियांना त्यांचे आयुष्य असेच व्यर्थ जावू न देता त्यास अर्थपुर्ण बनवायचे असेल तर त्यांनी महत्वाकांक्षी लोकांची संगत मिळविण्यासाठी स्वत: प्रयत्न केले पाहिजे.
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया यशस्वी आहेत. तेव्हा दैनंदीन गोष्टींमधून वेळ काढून दररोज कमीत कमी तास दोन तास अशा स्त्रियांच्या संगतीचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. त्यासाठी घराबाहेर पडणे शक्य नसल्यास ऑनलाईन किंवा सोशल मिडीयाचा आधार त्यांनी घ्यावा. त्या संबंधीत पुस्तकांचे वाचन करावे. कारण स्त्रिया कितीही कर्तुत्ववान असल्या तरीही रोजच्या धावपळीत त्यांना अशापद्धतीने क्रियाशील राहण्यासाठी योग्य संगतीची गरज ही भासतेच. असे केल्याने त्यांची मानसिकता हळूहळू करून अधिक चांगली होत जाईल. त्यांना सिमा ओलांडण्याचे सामर्थ्य मिळेल. त्याचप्रमाणे त्या मनाने कणखर बनतील. आत्मनिर्भर बनतील. आणि भविष्यात त्या स्वत:चे आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे घडवू शकतील.
2. स्त्रियांनी स्वत:ला अद्दयावत ठेवावे.
स्त्रिया गृहिणी असो अथवा नोकरदार त्यांची त्यांच्या कामावर पुर्ण निष्ठा असते. तसेच हृदयात घरातील माणसांप्रती प्रेम व काळजी असते. अशावेळी त्यांच्या कामात आपोआपच सेवाभाव येतो. आपल्याकडून कोणासही काहिही कमी पडू नये ह्या विचारांनी त्या रात्रंदिवस झटत असतात. आणि कोणासही तक्रारीला जागा मिळू देत नाहीत. सर्वांना खुश करण्याच्या नादात मात्र त्यांचे स्वत:कडे दुर्लक्ष होत जाते. त्यांचा अतिसेवाभाव बघून घरातील माणसेही हळूहळू त्यांना गृहीत धरू लागतात. तसेच त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून आपाआपल्या कामात व्यस्त होत जातात.
जेव्हा स्त्रियांना ह्या गोष्टीची जाणीव होवू लागते तेव्हा मात्र भरपूर वेळ निघून गेलेला असतो. त्या जगाच्या तुलनेत मागे पडलेल्या असतात. अशावेळी त्यांना काय करावे सुचत नाही. परंतू त्या क्षणी त्यांनी स्वत:शी पक्का निर्धार करावा. स्वत:मध्ये आत्मप्रेम जागृत करावे. स्वत:च्या व्यक्तीगत वेळेस निर्मीतीक्षम बनवावे. आपल्या दिसण्यात बदल आणण्यासाठी केसांची व त्वचेची निगा राखावी. वेशभुषेत परिवर्तन आणावे. ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांना त्यांचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवता येईल.
स्त्रियांनी आत्मचिंतन करून स्वत:मधील अशा कमकुवत जागा शोधाव्या. ज्यांच्यामुळे त्यांच्या प्रगतीत बाधा निर्माण होवू शकते. तसेच त्यांच्यावर सकारात्मकरीत्या मात करण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणी काय विचार करेल ह्याचा किंवा स्वत:च्या वयाचा विचार करू नये. कारण ह्या सिमा पार केल्या की त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. तेव्हा त्यांनी आपल्या विचारात नव्या विचारांची भर घालावी. स्वत:ला अद्दयावत ठेवण्यासाठी त्यांना हव्या त्या क्षेत्राची माहिती काढून त्या संबंधीत कोर्सेस करावेत. तसेच त्यांनी आयुष्यात पुढे जाण्याचा स्वत:शी निर्धार करावा. अशाप्रकारे स्त्रिया स्वत:च स्वत:च्या जीवनाच्या शिल्पकार ठरू शकतात.
3. स्त्रियांनी ध्येयाला सत्यात आणण्यासाठी कृती करावी
स्त्रिया कुटूंबासाठी त्यांच्या व्यक्तीगत ध्येयाला मागे टाकत आल्याची अनेक उदाहरणे बघायला मिळतात. त्यांच्या पुढे जे जीवन असते त्यालाच त्या स्विकारू लागतात. आणि त्यांच्या क्षमतांचा त्यांना विसर पडू लागतो. त्यानंतर त्या त्यांच्या रिकाम्या वेळेस उत्पादनक्षम बनवत नाहीत. व्यर्थ गप्पागोष्टींमध्ये रमू लागतात. आणि निरर्थक कामात संपुर्ण वेळ वाया घालवितात. तसेच स्वत:ची आणखीच अधोगती करून घेतात.
कधि त्यांच्या मनात तत्सम विचार आले तरिही कुठून आणि कशी सुरवात करावी हे कळण्यास त्यांना मार्ग नसतो. कारण त्यांनीत्या दृष्टीकोनातून स्वत:चा आत्मविश्वास गमावलेला असतो. अशावेळी विचार करत बसण्यापेक्षा त्यांनी कृती करण्यावर अधिक विश्वास ठेवला पाहिजे. कारण फक्त विचारांनी काहिही साध्य होत नाही. परंतू थोडी हिंमत जुटवून कृती करण्यास सुरवात केल्यास हळूहळू पुढचे मार्ग मोकळे होवू लागतात. त्याचप्रमाणे स्वत:वरचा विश्वासही प्रबळ होवू लागतो. स्त्रियांनी काहिही करून त्यांच्यातील अद्भूत क्षमतांवर विश्वास ठेवावा. तरच त्या त्यांच्या जीवनाला मनाप्रमाणे घडवू शकतील.
4.स्त्रियांनी स्वत:ला गृहित धरू नये
बर्याचदा घरातील पुरूषमंडळींकडून स्त्रियांना प्रोत्साहन मिळत नाही. किंवा त्यांच्या गुणांचे समर्थन होत नाही. अशावेळी स्त्रियांची द्वीधा मनस्थिती होते. त्यांची निर्णय घेण्याची क्षमता ढासळते. जेव्हा त्यांना कुठूनही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा त्यांनी स्वत:च स्वत:चा आधार बनावे. स्वत:च्या मनाला उभारी देणार्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. आपल्या कर्तव्यात कमी पडू नये. तसेच कर्तव्य पार पाडतांना मनात सेवाभाव ठेवावा. त्यांना दुखविणार्या प्रत्येकास मोठ्या मनाने माफ करत जावे.
स्त्रियांनी त्यांच्या अंतकरणात कारुण्य जागवावे. त्यामुळे त्यांचे मन शांत राहील. तसेच त्यांनी त्यांच्या हातून अशा कृती कराव्यात ज्यामुळे त्यांना मनातून आपण खुप महत्वाच्या व्यक्ती असल्यासारखे वाटू लागेल. कारण जेव्हा आपण स्वत:ला महत्वाचे समजू लागतो तेव्हा स्वत:वर अभिमान वाटावा अशाच गोष्टी आपण करू लागतो. स्त्रियांनी हिच त्यांच्या मधील सकारात्मक बदलांची खुण समजावी. आणि त्यांनी स्वत:ला कमजोर समजणे व गृहित धरणे बंद करावे. तरच त्या त्यांच्या जीवनास आकार देवू शकतील.
बर्याचदा स्त्रिया स्वत:च त्यांच्या अधोगतीस कारणीभूत असतात. कारण त्या कधि स्वत:चे तर कधि त्यांच्या सारख्या इतर स्त्रियांचे पाय ओढण्यास जुटलेल्या असतात. ह्या निरर्थक गोष्टीत वेळ वाया घालविण्यापेक्षा त्यांनी स्वत:साठी भक्कम पाऊल उचलून एक आदर्श निर्माण करावा. त्याचप्रमाणे त्यांच्या नंतर येणार्या लेकी सुनांना स्वतंत्र व्यक्तीमत्व उभारण्यास प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून समाजात स्त्रियांचे महत्व कमी होणार नाही. त्यांना कमकुवत समजून त्यांच्या वर कोणीही अत्याचार करणार नाही. तसेच त्या सन्मानास पात्र ठरतील.
Categories
- आत्मप्रेम (18)
- जनरल (38)
- मानसिक स्वाथ्य (27)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (14)
- होममेकर (9)