
मन उत्साही मन उर्जेचा स्त्रोत
त्यास ध्येयाच्या दिशेने वळवा
मनास बनवू नका दु:खाचे कारण
त्यास एकाग्र करून आयुष्य घडवा
मनास वयाचं बंधन नसतं. ते सदैव उत्साही व चिरतरूण असतं.
मनाची चंचलता आपल्याला मानसिकरीत्या दमवू सुद्धा शकते.
कारण मनास हवं असलेलं सर्वकाही आपण आयुष्यात मिळवू शकत नाही.
कधीकधी ध्येयाच्या दिशेने प्रवास करत असतांना आपल्याला काही गोष्टी नाईलाजास्तव सोडाव्या लागतात.
ज्याला आपण मन मारून जगणं असं म्हणून स्वत:ला त्वरीत परिस्थितीचा बळी देखील घोषित करतो.
शिवाय जे हाती लागलं त्या आनंदापेक्षा जे सुटलं त्यासाठीच अधिक कुढत बसतो.
अशाप्रकारे आपण आपल्या इतक्या उर्जावान मनालाच दु:खाचं कारण बनवून बसतो.
कारण मनास जे जे हवं असतं, ते आपली संपूर्ण उर्जा त्या त्या गोष्टींवर लावतं.
अशाप्रकारे आपले लक्षही अनेक जागी विखुरले जाते.
ज्यामुळे आपले आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे अर्थातच जास्त कठीण होते.
त्यासाठी आपण स्वत:ला ‘मन एकाग्र’ करून जगण्याची सुदृढ सवय लावावी.
त्याचप्रमाणे आपल्या मनास संस्कारांनी संयमी बनवून त्याला ध्येयाच्या दिशेने वळवावे.
आपल्या मनास लावलेली ही एक उत्तम सवय आपल्याला असामान्य बनविण्यास कारणीभूत ठरेल.
Categories
- आत्मप्रेम (19)
- जनरल (42)
- मानसिक स्वाथ्य (28)
- रिलेशनशिप्स (28)
- स्त्रियांसाठी (27)
- स्पेशल पोस्ट (15)
- होममेकर (9)