रिलेशनशिप्स

तारुण्यातील मुले आणि पालकांची मैत्री

 जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांना आई-वडीलांच्या प्रेमाची आणि त्यांच्या प्रेमाने केलेल्या संगोपनाची नितांत गरज असते. जसे एखाद्या कोवळ्या रोपास विशेष देखभालीची, जनावराने तोंड लावू नये म्हणून कुंपनाची, तसेच रखरखत्या उन्हापासून वाचवण्याचीही गरज असते. तसेच आपले बालपणही असते ज्यात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपल्याला आपल्या सभोवताल असलेल्या माणसांच्या सहवासात मायेचा व वात्सल्याचा अनुभव हवा हवासा वाटत असतो. त्यामुळे जन्मदात्यांच्या […]

तारुण्यातील मुले आणि पालकांची मैत्री Read More »

प्रियजनांचा अंत – अपूरणीय नुकसान

जीवनाचा प्रवास हा एखाद्द्या ट्रेन सारखा असतो. आपण सगळे मिळून हा प्रवास करीत असतो. ह्या प्रवासात आपण एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेतो. त्यात सहभागी होतो. एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे आप-आपसात स्वारस्य निर्माण होते. नाती-गोती निर्माण होतात. मैत्रीचे सुंदर बंध निर्माण होतात, जे असे वाटते की कधिही तुटू नयेत. त्यांच्या सहवासाच्या आनंदात आपल्याला स्वत:लाही विसरून जावेसे वाटते. त्यामुळे आपण

प्रियजनांचा अंत – अपूरणीय नुकसान Read More »

कुटूंबाचे प्रेम शब्दात न मावणारे, पण ……..

 आपल्या जीवनप्रवासात आपले सगे-सोयरे, आपले मित्र, आपले कुटूंब तसेच आपण निवडलेले कुटूंब ह्यांचा मोलाचा सहभाग असतो. कुटूंबाचे प्रेम, कुटूंबाचे पाठबळ, कुटूंबाचे मार्गदर्शन आणि कुटूंबाची मोलाची साथ ह्या गोष्टी आयुष्यात आपल्यासाठी पृथ्वीमोलाच्या असतात. कारण ह्या सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे  आपल्या आयुष्यात असे  साम्राज्य असते कि त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. त्यांच्या अतुलनीय सहकार्याशिवाय आपले इथवर पोहोचणे शक्य झाले नसते

कुटूंबाचे प्रेम शब्दात न मावणारे, पण …….. Read More »

‘आई’ चा सखोल अर्थ

 ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ”    मित्रांनो, आई ह्या दैवी शब्दाचा सखोल अर्थ केवळ  वात्सल्याशी जोडला गेलेला आहे. आईच्या अंतर्मनातील सौंदर्य निस्वार्थ प्रेमाने सजलेले असते. ज्याला आईची ही निस्वार्थ व अतुलनीय माया लाभली.  तो कितीही आर्थिक विवन्चनांनी ग्रस्त असला किंवा त्याचे जीवन समस्यांनी व्याप्त असले. तरीही तो मानसिक समाधानाने  धनवान असतो. परंतू जो काही कारणाने आईच्या प्रेमाला मुकला आहे. तो मात्र धनवान

‘आई’ चा सखोल अर्थ Read More »

उत्कृष्ट नेतृत्व

नेतृत्व करणे  म्हणजे खूप मोठ-मोठ्या उलाढाली करणे  असा  अर्थ  होत  नाही. किंवा खूप मोठ्या समूहाचेच नेतृत्व करणे असाही शब्दश: अर्थ होत नाही. नेतृत्व करणारा एक कुटूंब प्रमुख असू शकतो. किंवा एक आईसुद्धा असू  शकते. अट  फक्त एकच  असते  कि  नेतृत्व करणार्‍याला त्याचा व्यक्तिगत स्वार्थापलिकडे बघता आले पाहिजे. त्याचे  प्रत्येक पाउल स्वत:मध्ये सर्वतोपरी सुधारणा आणत राहण्याच्या  दिशेने पडले

उत्कृष्ट नेतृत्व Read More »

प्रेम व्यक्त करणे सोपे, निभावणे कठीण

आपणही ऐकले असेलच कि हंस पक्षी जीवनात एकदाच जोडा बनवितो. तसेच आपल्या जोडीदारासोबतच्या नात्याला त्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत निभवतो. इथे आपल्याला खरे प्रेम आणि त्याला आयुष्यभर निभावल्या गेल्याचे मुर्तीमंत उदाहरण बघायला मिळते. कधी एखाद्या  वयोवृद्ध जोडप्यास एकमेकांचा हात हातात घेवून एकमेकांना आधार देत रस्त्याने जातांना बघा. त्यांनी त्यांच्या तरुणपणातील त्या दिवसात एकत्र येवून एकमेकांप्रती व्यक्त केलेले प्रेम आणि ते

प्रेम व्यक्त करणे सोपे, निभावणे कठीण Read More »

आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम

घर म्हणजे  आपल्या  भौतिक श्रीमंतीचा बडेजाव दाखविण्यासाठी उभारण्यात आलेली वास्तू नाही तसेच घर म्हणजे दगड विटांनी उभ्या केलेल्या चार भिंतीही नाही. तर त्या चार भिंती घरातील माणसांनी घरात रूपांतरीत होतात. त्यांच्या आपसातील जिव्हाळा व आपुलकीने साध्या झोपडीवजा घरालाही स्वर्गाचे रूप प्राप्त होते. परंतू जेव्हा घरातील माणसांच्या विचारातील मतभेद विकोपाला जातात तेव्हा मात्र घराचे रणांगण होते.

आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम Read More »

प्रेम

प्रेम ह्या दोन अक्षरी वाटणार्‍या  शब्दात विश्वाची भव्यता सामावलेली आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात  म्हणून ते भावनेने व्यक्त केले जाते. प्रेमात बोलणे कमी आणि समजणे जास्त असते. प्रेमाचा अर्थ प्रगाढ आणि सखोल असतो. प्रेमाशिवाय सगळेच निरर्थक असते कारण प्रेम चराचरात बहरलेले आहे. वृक्षवेलीत सामावलेले आहे. प्रेम म्हणजे आई. जिच्या प्रेमास आपण वात्सल्य माया असे संबोधतो. आईचे प्रेम

प्रेम Read More »

वडील – म्हणजे एक नेतृत्व

 ‘वडील’ हे आईचेच दुसरे रूप असतात. कारण आईच्या हृदयात मायेचा आणि वात्सल्याचा सागर असतो. तर वडील आपल्या डोळ्यात प्रेम न दाखविता मुलांवर प्रेम करत असतात. त्याचप्रमाणे वडीलांचा आदरयुक्त धाक दाखवूनच आई मुलांना शिस्त लावत असते. त्यामुळे मुले वडीलांपासून जरा लांबच राहतात आणि त्यांच्या नात्यात एकप्रकारची औपचारीकता असते. मुले वडीलांवर आई इतका हक्क गाजवत नाहीत. मुले आई साठी निबंध

वडील – म्हणजे एक नेतृत्व Read More »

आई बाबा

आई- वडीलांचे मुलांच्या जीवनात सर्वोच्च स्थान असते. जणूकाही ते मुलांसाठी देवच असतात. त्यामागचे कारण हे असते कि त्यांचे मुलांवर विनाअट प्रेम असते. आणि मुलांना हे प्रेम त्यांच्या व्यतीरीक्त आणखी कोठेही अनुभवास येत नाही. आई-वडील मुलांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. त्यांचे सगळे लाड-कौतुक पुरवीतात आणि त्यांना सर्वकाही पूरे पडावे ह्याकरीता रात्रंदिवस झटत असतात. त्यामुळे मुलांच्या मनात त्यांच्या

आई बाबा Read More »