स्त्रियांसाठी

स्त्रिजन्म – एक आव्हान

 घरात मुलीचा जन्म होणे तसेच तिच्या बालपणीचा काळ कोणत्याही कुटूंबासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. कारण त्यांच्यातील खट्याळपणा व निरागसपणा हा कुटूंबियांना वेड लावणारा असतो. त्या गोंडस चिमुकल्या रुपाचे लाड-कौतुक करणे, त्यांना अंगा-खांद्यावर खेळवणे म्हणजे कमालीची सुखावणारी गोष्ट असते. त्यासोबत घरात मुलगी जन्मास येणे म्हणजे तिच्या रुपाने लक्ष्मीचे आगमन होणे असेही मानले जाते. काही धर्मपरंपरेत मुलींना अगदी […]

स्त्रिजन्म – एक आव्हान Read More »

स्त्रिधन

 घरात मुलीचे आगमन झाल्यावर आई-वडीलांना आनंद होण्यासोबतच एका मोठ्या जबाबदारीची व कर्तव्याची जाणीव होते. कारण आई-वडील मुलीला परक्याचे धन मानतात. समाजनियमानुसार मुली आई-वडीलांच्या घरात पाहुण्याच असतात. आपल्या आयुष्याचा काही काळ तिथे घालवून त्या दिल्या घरी निघून जातात. आणि तेच त्यांचे खरे आयुष्य व घर असते. परंतू आई-वडीलांना आपल्या मुली प्राणांहून प्रिय असतात. त्यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे

स्त्रिधन Read More »

स्त्रियांच्या अस्तित्वाचा लढा

 समाजात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक जातीधर्मांना, वंचितांना त्याचबरोबर स्त्रियांनाही मोठा संघर्ष करावा लागला. स्त्रियांचा संघर्ष तर पुरुषी मानसिकतेशी आजतागायत सुरूच आहे. समाजातील पुरुषी मानसिकता जी स्वत:ला स्त्रियांच्या तुलनेत वरचढ समजते. ती युगा नु युगांपासून चालीरीती व रूढी परंपरांच्या आडून स्त्रियांना जिवंतपणीच नरकयातना देत आली आहे. तरीसुद्धा स्त्रियांनी अनेक अग्नीदिव्यान्ना पार करत आपले समाजातील स्थान

स्त्रियांच्या अस्तित्वाचा लढा Read More »

स्त्रियांची पडद्यामागची भूमिका

स्त्रियांना नैसर्गिकपणे लाभलेली भावनांची सखोलता, त्यांच्यातील दयाभाव तसेच त्यांच्या हृदयातील अलौकिक वात्सल्य ह्या मौल्यवान गोष्टी त्यांना आंतरिक सौंदर्याने व कणखरतेने समृद्ध करत असतात. त्याचबरोबर ह्या गोष्टी त्यांची खरी ताकद व त्यांनी स्वबळावर आपल्या जीवनाचे शिल्पकार होण्यास आवश्यक असलेली पुंजी देखील असते. स्त्रियांच्या अजोड क्षमता ह्या त्यांच्यातच सामावलेल्या असतात. परंतू कधीकधी परिस्थितीमुळे, माणसांमुळे त्यांना चालना व

स्त्रियांची पडद्यामागची भूमिका Read More »

स्त्रियांचे सक्षम होणे का आवश्यक आहे

 स्त्रियांचे सक्षम होणे म्हणजे त्यांचे केवळ आर्थिकरीत्या सबळ होणेच नाही. तर त्यासोबत त्यांच्यात आत्मसम्मान जागृत होत जाणे. त्यांचे त्यांच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांनी सुज्ञ व सुशिक्षित होत जाणे. एक माणूस म्हणून सम्मानास पात्र ठरणे. त्यांना आत्मविश्वास व आत्मप्रेमाची प्रचीती होणे. त्यांना स्वत:ची किंमत कळणे. हे देखील अत्यंत महत्वाचे असते. कारण आपल्या पुरुषप्रधान संस्कृती अनुसार एक स्त्री

स्त्रियांचे सक्षम होणे का आवश्यक आहे Read More »

आजची स्त्री

  सृष्टीने मानवजातीला स्त्रियांच्या स्वरूपात एक अनमोल भेट देवून अलंकृत केलेले आहे. किंबहुना धरातलावरील स्त्रियांचे अस्तित्वच सर्वत्र मांगल्य प्रदान करणारे आहे. त्याचप्रमाणे स्त्री ही निसर्गाने घडविलेली अप्रतिम कलाकृती आहे. तिच्या बाह्यारूपास साजेसे तिचे वात्सल्याने, प्रेमाने, दयेने तसेच निस्वार्थतेने व्यापलेले अंतर्मनातील भावनांचे साम्राज्य ह्यांच्या एकरूपतेनेच कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य पूर्णपणे परिभाषित होत असते. स्त्रियांच्या अलौकिक सौंदर्याबरोबरच त्यांच्या

आजची स्त्री Read More »

स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध

      स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात हे आपण केवळ ऐकलेलेच नाही तर काही ना काही प्रमाणात प्रत्येकाने अनुभवलेले सुद्धा असते. कारण घर असो किंवा कार्यालय स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला त्यांचे काही मुख्य गुणधर्म बघावयास मिळतातच. जसे मनातल्या मनात एकमेकींचा मत्सर करणे. ज्यात त्यांचे सौंदर्य, बौद्धिक उच्चांक तसेच कारकिर्दीतील उच्च स्थान ह्या गोष्टीमधील चढाओढ समाविष्ट असते.

स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध Read More »