Rekha

प्रयत्नार्थी परमेश्वर

         ” प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” ह्या म्हणीच्या संदर्भांप्रमाणे आपल्या जीवनात आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करून अगदी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही सत्यात उतरवू शकतो. कारण गोष्टींचे घडून येणे किंवा न घडणे हे जरी कोणाच्याही हातात नसले तरीही त्यापूर्वीचा काळ हा मात्र आपल्या प्रयत्नांचा असतो. जर आपण आपल्या प्रयत्नांप्रती जागरूक असलो. प्रयत्नांना आपल्या […]

प्रयत्नार्थी परमेश्वर Read More »

आजची स्त्री

  सृष्टीने मानवजातीला स्त्रियांच्या स्वरूपात एक अनमोल भेट देवून अलंकृत केलेले आहे. किंबहुना धरातलावरील स्त्रियांचे अस्तित्वच सर्वत्र मांगल्य प्रदान करणारे आहे. त्याचप्रमाणे स्त्री ही निसर्गाने घडविलेली अप्रतिम कलाकृती आहे. तिच्या बाह्यारूपास साजेसे तिचे वात्सल्याने, प्रेमाने, दयेने तसेच निस्वार्थतेने व्यापलेले अंतर्मनातील भावनांचे साम्राज्य ह्यांच्या एकरूपतेनेच कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य पूर्णपणे परिभाषित होत असते. स्त्रियांच्या अलौकिक सौंदर्याबरोबरच त्यांच्या

आजची स्त्री Read More »

उच्च आत्मप्रतीमेतून प्रतिष्ठा

आपल्या नजरेत स्वत:विषयी आदर असणे, आपल्याला स्वत:वर गर्व वाटणे, आपल्यामध्ये मीपणाचा अंशही नसणे तसेच आपल्या व्यक्तीमत्वात विनम्रभाव व मनाचा कणखरपणा असणे ह्या सर्व गोष्टी आपली आपल्या मनात उच्च आत्मप्रतिमा घडवत जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतात. परंतू ह्या सर्व गोष्टींचे रोपण आपल्या व्यक्तीमत्वात इतक्या स्वाभाविकपणे होत नसते. तर त्यासाठी आपल्या आयुष्याचा पहिला व सर्वात महत्वपूर्ण टप्पा

उच्च आत्मप्रतीमेतून प्रतिष्ठा Read More »

स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध

      स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात हे आपण केवळ ऐकलेलेच नाही तर काही ना काही प्रमाणात प्रत्येकाने अनुभवलेले सुद्धा असते. कारण घर असो किंवा कार्यालय स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला त्यांचे काही मुख्य गुणधर्म बघावयास मिळतातच. जसे मनातल्या मनात एकमेकींचा मत्सर करणे. ज्यात त्यांचे सौंदर्य, बौद्धिक उच्चांक तसेच कारकिर्दीतील उच्च स्थान ह्या गोष्टीमधील चढाओढ समाविष्ट असते.

स्त्रियांमधील मैत्रीपूर्ण बंध Read More »