Rekha

संयम राखणे अनिवार्य आहे

 सृष्टीतील सुक्ष्म जीवजंतूंपासून ते पशु-पक्ष्यांपर्यंत सर्वांवर आपण दृष्टीकटाक्ष टाकल्यास आपल्याला सर्वत्र संयम आणि चिकाटीची प्रचीती येते. आकाराने अगदी छोटीशी असलेली मुंगी परंतू तिची कार्यक्षमता आणि चिकाटी बघून आपण अचम्भीत होतो. कारण अनेकदा खाली घसरूनही ती आपला संयम न सोडता प्रयत्नशील राहते. तसेच तिला जिथे पोहचायचे असते तिथे पोहोचल्याशिवाय ती शांत बसत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या पक्ष्याच्या जोड्याला सुर्य […]

संयम राखणे अनिवार्य आहे Read More »

कुटूंबाचे प्रेम शब्दात न मावणारे, पण ……..

 आपल्या जीवनप्रवासात आपले सगे-सोयरे, आपले मित्र, आपले कुटूंब तसेच आपण निवडलेले कुटूंब ह्यांचा मोलाचा सहभाग असतो. कुटूंबाचे प्रेम, कुटूंबाचे पाठबळ, कुटूंबाचे मार्गदर्शन आणि कुटूंबाची मोलाची साथ ह्या गोष्टी आयुष्यात आपल्यासाठी पृथ्वीमोलाच्या असतात. कारण ह्या सर्वांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे  आपल्या आयुष्यात असे  साम्राज्य असते कि त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. त्यांच्या अतुलनीय सहकार्याशिवाय आपले इथवर पोहोचणे शक्य झाले नसते

कुटूंबाचे प्रेम शब्दात न मावणारे, पण …….. Read More »

‘आई’ चा सखोल अर्थ

 ” स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ”    मित्रांनो, आई ह्या दैवी शब्दाचा सखोल अर्थ केवळ  वात्सल्याशी जोडला गेलेला आहे. आईच्या अंतर्मनातील सौंदर्य निस्वार्थ प्रेमाने सजलेले असते. ज्याला आईची ही निस्वार्थ व अतुलनीय माया लाभली.  तो कितीही आर्थिक विवन्चनांनी ग्रस्त असला किंवा त्याचे जीवन समस्यांनी व्याप्त असले. तरीही तो मानसिक समाधानाने  धनवान असतो. परंतू जो काही कारणाने आईच्या प्रेमाला मुकला आहे. तो मात्र धनवान

‘आई’ चा सखोल अर्थ Read More »

मनातील वेदनांवर नैसर्गिक उपचार

आपल्या जीवनात जन्मताच आपल्याला अनेक नात्यांशी ओळख करून दिली जाते. आई-वडील  व बहिण-भाऊ अशा विवीध नात्यांनंतर आपले बालपणीचे व शालेय जीवनातील मित्र आपल्या आयुष्याला दस्तक देतात  आणि जेव्हा आपण मोठे होवून आपल्या खर्‍या जीवनाला सुरवात करतो तेव्हा ह्या समाजाशी आपली ओळख होते. जन्मापासून मोठे होईस्तोवर जे जे लोक जीवनाच्या प्रवासात आपल्या संपर्कात येतात ते आपल्या मनावर त्यांची छाप

मनातील वेदनांवर नैसर्गिक उपचार Read More »

मानसिक वेदनांना लगाम लावा

वेदना ह्या मानसिक असो अथवा शारिरीक त्यांना सहन करणे सोपी गोष्ट नाही. शारिरीक वेदना निदर्शनात येतात. तसेच त्यांची सुषृशा करणे ही सोपे असते. परंतू मानसिक वेदनांचे तसे नसते. त्या आतल्या आत आपल्या मनाला पोखरतात. मनाच्या आत वादळ उठलेले असते. परंतू ते आपल्या व्यतिरीक्त कोणालाही दिसत नाही. सतत मनात चाललेला संघर्ष इतरांच्या समजन्या पलिकडचा असतो. त्रास होतोय हे कळून

मानसिक वेदनांना लगाम लावा Read More »

उत्कृष्ट नेतृत्व

नेतृत्व करणे  म्हणजे खूप मोठ-मोठ्या उलाढाली करणे  असा  अर्थ  होत  नाही. किंवा खूप मोठ्या समूहाचेच नेतृत्व करणे असाही शब्दश: अर्थ होत नाही. नेतृत्व करणारा एक कुटूंब प्रमुख असू शकतो. किंवा एक आईसुद्धा असू  शकते. अट  फक्त एकच  असते  कि  नेतृत्व करणार्‍याला त्याचा व्यक्तिगत स्वार्थापलिकडे बघता आले पाहिजे. त्याचे  प्रत्येक पाउल स्वत:मध्ये सर्वतोपरी सुधारणा आणत राहण्याच्या  दिशेने पडले

उत्कृष्ट नेतृत्व Read More »

खळखळून हसण्याचे फायदे

आजच्या काळात लोक निरनिराळ्या कारणांमुळे सतत ताण-तणावात असतात. त्यामुळे त्यांचे निरागसपणे खळखळून हसणे दुर्लभ होत चालले आहे. उन्हाळ्यात सगळी भावंडे एकत्र येवून मौजमस्ती करतांंनाचे  तसेच हसता खिदळतांना चे चित्र आता फारच कमी बघावयास मिळते. त्याचीही  अनेक कारणे आहेत. आता लहान मुले विवीध समर क्लासेस मध्ये व्यस्त असतात. त्यानंतर उन्हाळ्यातही त्यांना शाळेकडून मिळालेला गृहपाठ करावा लागतो. आताच्या

खळखळून हसण्याचे फायदे Read More »

पिढी घडवूया कृतीतून

आज ज्या वेगाने तंत्रज्ञानामुळे जगाचा कायापालट होत आहे. त्याची प्रचीती आपल्याला रोजच्या जगण्यातून होतच आहे. लोप पावत चाललेल्या पिढीने मात्र शिक्षणरूपी ज्ञानार्जनाची सुरवात पाटी लेखणीने केली होती. तेव्हा शाईनेच कागदावर लिहिण्यास प्रादान्य दिले जाई. अभ्यासक्रमाचे स्वरूपही तेव्हा आताच्या तुलनेत निराळे होते. शिक्षणाच्या जगात तांत्रिक साधनांच्या उपयोगाचा थांगही लागलेला नव्हता. तरीसुद्धा तेव्हाच्या शिक्षण पद्धतीनुसारही लोक सर्व

पिढी घडवूया कृतीतून Read More »

माझे पहिले पुस्तक

मी माझा लिखाणाचा प्रवास सुरू करून आता दोन पेक्षा अधिक वर्ष झालेत. हा प्रवास सुरू करण्यामागे माझी कोणतीही विशेष महत्वाकांक्षा नव्हती. परंतू माझा व्यक्तीगत रिकामा वेळ सार्थकी लागावा. त्याचप्रमाणे शक्य असल्यास त्यामधून मला थोडेफार अर्थार्जन करता यावे. इतकीच सदिच्छा होती. कारण मी एक गृहिणी आहे. म्हणूनच गृहिणी असलेल्या स्त्रियांनी जर स्वत:ची आत्मप्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीकोनातून स्वत:चे

माझे पहिले पुस्तक Read More »

श्रीमंतीची परिभाषा

 आजच्या काळात एखाद्द्या व्यक्तीची श्रीमंती ही भौतिक सुख-सुविधा देणार्‍या वस्तु आणि संपत्ती तसेच प्रसिद्धीशी जोडली जाते. किंबहुना वरवर दिसणार्‍या महागड्या गाड्या, मोठा बंगला, प्रचंड जमापुंजी, धन-दौलत असणारे आणि ज्यांच्या नावापुढे मोठ-मोठ्या पदव्या आहेत. जे विदेशात मोठ्या वेतनाच्या नोकर्‍या करत आहेत. अशा लोकांना समाजाने श्रीमंत घोषीत केलेले आहे. त्यांना समाजात प्रतिष्ठा असते. त्यांच्या शब्दाला मान असतो. आणि जो मनुष्य मनाने श्रीमंत

श्रीमंतीची परिभाषा Read More »