Rekha

दयेने विश्वाला जिंका

 आपण सर्व बुद्धांच्या पवित्र चरणांनी पावन झालेल्या ह्या पावन भुमीवरचे रहिवाशी आहोत. येथिल चराचरामध्ये  आणि मातीच्या कणा-कणात दयेचा आणि प्रेमाचा निवास आहे. प्राणिमात्रांमध्ये, वृक्ष-वेलींमध्ये आपल्याला त्याची अनुभूती येते. सृष्टी कोणाचेही गुण-दोष बघून त्यांच्यात भेदभाव करत नाही. सर्वांवर सारखीच माया करते. वृक्ष वाटसरूंना सावली देतात. गोड फळांनी प्रत्येकाची भूक भागवितात. हिंस्त्र पशू देखील त्यांना भूक लागल्या शिवाय कोणत्याही अन्य […]

दयेने विश्वाला जिंका Read More »

प्रेम व्यक्त करणे सोपे, निभावणे कठीण

आपणही ऐकले असेलच कि हंस पक्षी जीवनात एकदाच जोडा बनवितो. तसेच आपल्या जोडीदारासोबतच्या नात्याला त्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत निभवतो. इथे आपल्याला खरे प्रेम आणि त्याला आयुष्यभर निभावल्या गेल्याचे मुर्तीमंत उदाहरण बघायला मिळते. कधी एखाद्या  वयोवृद्ध जोडप्यास एकमेकांचा हात हातात घेवून एकमेकांना आधार देत रस्त्याने जातांना बघा. त्यांनी त्यांच्या तरुणपणातील त्या दिवसात एकत्र येवून एकमेकांप्रती व्यक्त केलेले प्रेम आणि ते

प्रेम व्यक्त करणे सोपे, निभावणे कठीण Read More »

लोकात मिसळण्याचे दडपण

पूर्वी लोकात मिसळणे हा सर्वस्वी मानापमानाचा विषय होता. त्यामुळे लग्न समारंभ ह्यात जास्तीत जास्त लोकांना आदरातिथ्याने आमंत्रित करून. आपल्या आयुष्यात मधुर संबंधांचा विस्तार केला जात असे. कारण तेव्हा सामाजीकरण हे एकात्मतेचे किंवा एकजुटतेचे प्रतिनिधीत्व करत असे. मग ते एका गावाचे असो एका वसाहतीचे असो किंवा विशिष्ट जाती धर्माचे असो. कोणत्याही निमित्ताने लोकांनी एकत्र येवून. आपले

लोकात मिसळण्याचे दडपण Read More »

आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम

घर म्हणजे  आपल्या  भौतिक श्रीमंतीचा बडेजाव दाखविण्यासाठी उभारण्यात आलेली वास्तू नाही तसेच घर म्हणजे दगड विटांनी उभ्या केलेल्या चार भिंतीही नाही. तर त्या चार भिंती घरातील माणसांनी घरात रूपांतरीत होतात. त्यांच्या आपसातील जिव्हाळा व आपुलकीने साध्या झोपडीवजा घरालाही स्वर्गाचे रूप प्राप्त होते. परंतू जेव्हा घरातील माणसांच्या विचारातील मतभेद विकोपाला जातात तेव्हा मात्र घराचे रणांगण होते.

आई-वडीलांच्या भांडणाचे मुलांच्या मनावर होणारे गंभीर परिणाम Read More »

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रिची भुमिका

आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या कालखंडात समाजातील चिवट चालीरीती व रूढी परंपरांमुळे एक माणूस म्हणून पाहिले गेले नाही हे लक्षात येते. त्याचप्रमाणे पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना आपले पाय जमविण्यासाठी फार कष्ट सुद्धा घ्यावे लागले. हे कटाक्षाने जाणवते. फार पुर्वीच्या काळात बालविवाह पद्धतीने लग्न होत असत. लहान लहान मुलींची एखाद्द्या विदुराशी किंवा वयाने अतोनात मोठ्या असलेल्या माणसाशी लग्न लावले जात

पुरूषप्रधान संस्कृतीत स्त्रिची भुमिका Read More »

कामावरून माणसांना दिली जाणारी वागणूक

 रोज सकाळी कचरा उचलणार्‍यांच्या गाड्या शहरात सर्वत्र फिरत असतात. गाडीवर वाजणारे गाणे प्रत्येकास परिचयाचे झाले आहे. गाडीत बसलेली दोन तरुण मुले. सराईतपणे आणि मन लावून घरोघरचा कचरा गोळा करून गाडीत टाकतात. त्यावेळी मात्र बरेच जण अर्धवट झोपेत आपल्या बिछान्यातच असतात. गाडीवर उंच आवाजात वाजणार्‍या गाण्याने लोकांची झोपमोड होते. तेव्हा ते बाहेर येवून गाणे बंद करण्यास

कामावरून माणसांना दिली जाणारी वागणूक Read More »

मुलांच्या संगोपनात दुरदृष्टी असावी

आपल्या आयुष्यात मुलांचे असणे सुंदर स्वप्नासारखे असते. कारण मुलांमधील निरागसपणाने आपल्या मनावरील कितीही मोठा ताण कमी होतो. मुलांचा सहवास, त्यांचे कर्णमधुर बोलणे तसेच त्यांचे घरभर वावरणे घराला घरपण आणते. त्याचबरोबर आपल्यात सकारात्मक उर्जा भरते. त्यामुळे आई-वडील मुलांशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाहीत. मुले आई-वडीलांचे जगच व्यापून टाकतात. त्यामुळे आई वडील मुलांच्या संगोपनात आपल्या हृदयाचा कस लावतात.

मुलांच्या संगोपनात दुरदृष्टी असावी Read More »

प्रेम

प्रेम ह्या दोन अक्षरी वाटणार्‍या  शब्दात विश्वाची भव्यता सामावलेली आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात  म्हणून ते भावनेने व्यक्त केले जाते. प्रेमात बोलणे कमी आणि समजणे जास्त असते. प्रेमाचा अर्थ प्रगाढ आणि सखोल असतो. प्रेमाशिवाय सगळेच निरर्थक असते कारण प्रेम चराचरात बहरलेले आहे. वृक्षवेलीत सामावलेले आहे. प्रेम म्हणजे आई. जिच्या प्रेमास आपण वात्सल्य माया असे संबोधतो. आईचे प्रेम

प्रेम Read More »

आत्मजागृकता

आपल्याला कित्येकदा सकाळी उठल्यावर दिवसाची सुरवात करत असतांना हुरूप  जाणवत  नाही. एकप्रकारचा नकारात्मक तणाव आपल्या मनावर असल्यासारखे वाटते. तरीही आपण  प्रत्येक गोष्ट मनापासून व भावना ओतून करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपले कशातही मन लागत नाही. आत्मविश्वास ढासळल्यासारखा वाटतो. आपल्याला अचानक असे वाटू लागते कि आपल्यात अशा कोणत्याही क्षमता नाहीत. ज्यांच्यामुळे आपण जीवनात यशास पात्र होवू. त्या विचारांचा

आत्मजागृकता Read More »

आपले आयुष्य दिव्याप्रमाणे असावे

आपण पृथ्वीतलावर मनुष्य रूपात जन्म घेतलेला आहे. त्यामुळे इतर प्राणीमात्रांच्या तुलनेत आपली बुद्धीमत्ता तल्लख आहे. परीणामस्वरूपी आपल्याला चांगल्या-वाईटाची समजही जास्त प्रमाणात आहे. ज्यामुळे मनुष्य जीवनाला वेगळेच वळण लागले आहे. आपल्यात लोभ मोह स्वार्थ मत्सर द्वेष हे राक्षशी प्रवृत्तीस बढावा देणारे दुर्गूण आहेत. त्याचबरोबर प्रेम दया करूणा निस्वार्थभाव सेवाभाव हे माणुसकीचे दर्शन घडविणारे सुगूण सुद्धा आहेत.

आपले आयुष्य दिव्याप्रमाणे असावे Read More »