इनोव्हेटीव्ह मॉम
आयुष्यभर एका प्रामाणिक गृहिणीचे कर्तव्य निभावणारी ‘आई’ जी रोज सकाळी न चुकता सर्वांच्या अगोदर उठते. घरातील प्रत्येकाचे वेळापत्रक तिला तोंडपाठ असते. प्रत्येकास वेळेत कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता यावे ह्यासाठी तिची दररोज सकाळी केविलवाणी धडपड चाललेली असते. आईच्या भरवशावर सगळेजण मात्र बिनधास्त असतात. तसेच प्रत्येकाची आपआपल्या कामानिमित्त घराबाहेर जाण्यासाठी घाई सुरू असते. सर्वांच्या आंघोळी आटोपतात आणि बादली कपड्यांनी जड […]