Rekha

मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास

एका सुंदर टवटवीत व पुर्ण आकार घेतलेल्या फुलाला बघून जसे आपले मन मोहरून जाते. त्याचप्रमाणे त्या फुलाच्या सुवासात व मनमोहक सौंदर्यात आपण असे रेंगाळतो कि आपल्याला आपल्या आसपास काय चालले आहे ह्याचाही काही क्षणांकरीता विसर पडतो. तसेच एखाद्या सुंदर नात्याची सुरवात ज्यात कोमलता असते, हळूवार केलेल्या स्पर्शाला महत्व असते, मनाला मनाची भाषा कळते, एकमेकांची वाट बघण्यात तल्लीन होणे असते […]

मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास Read More »

देशकन्या

  शाळेच्या पवित्र पटांगणावर सामूहिकरीत्या प्रतिज्ञा ग्रहण करत असतांना प्रत्येक विद्यार्थ्याच्या बालमनावर आपल्या देशबांधवांप्रती कर्तव्यांचे पालन करण्याचा संदेश वारंवार कोरला जातो. तरीसुद्धा मोठेपणी आपल्याच देशकन्येच्या व देशभगीनीच्या शरीराची विटंबना करतांना विकृतीचा कळस गाठलेल्या माणसांना लाज वाटत नाही. किंवा त्याक्षणी त्यांना आपल्याच घरातील आई बहिण मुलगी ह्या स्त्रियांची आठवण देखील होत नाही. कलकत्ता शहरात घडलेल्या ह्या

देशकन्या Read More »

मदतीचा हेतू व पद्धत

माणुसकी हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. प्रत्येकाने तो एक माणुस म्हणून अन्य माणसाशी वागतांना पाळणे अनिवार्य आहे.त्याचप्रमाणे आपला कोणाची मदत करण्याच्या मागचा हेतूही माणुसकीचाच असला पाहिजे. आपण कोणा गरजूस केलेली निरपेक्ष मदत आपल्या आणि गरजूलाही समाधान देवू शकली  पाहिजे. त्यामुळे मदत करतांना आपल्या मनात करुणेचे भाव असणे महत्वाचे असते.    बर्‍याचदा आपल्या घरात जुन्या वस्तू, कपडे साठतात.

मदतीचा हेतू व पद्धत Read More »

घरात स्थिर उत्पन्न असण्याचे फायदे

 एकोणिसाव्या शतकात बहुतांशी लोक सरकारी नोकर्‍या करत असतांना दिसत असत. फार कमी म्हणजे विशिष्ट समाजातील लोकच व्यवसायांशी जुळलेले असायचे. तेव्हा जास्तीत जास्त घरांमध्ये पुरूष एकटा कमविणारा असायचा कारण घरातील स्त्रिया गृहिणीचे कर्तव्य पार पाडत असत. परंतू तरिही घरात आर्थिक नियोजन हे इतके सुनियोजीत असायचे कि एकट्या कमविणार्‍याच्या अत्यंत कमी वेतनातही संपुर्ण कुटूंब सुख समाधानाने जीवन

घरात स्थिर उत्पन्न असण्याचे फायदे Read More »

क्लिष्ट स्वभावाचे दुष्परीणाम

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. कोणत्याही माणसाची ओळख त्याच्या स्वभावावरून होत असते. आपले बालपण कसे व कोठे गेले तसेच आपण त्यामधून काय शिकत गेलो आणि मोठे होता होता आपल्यात काय राहून गेले त्यावरून आपला स्वभाव बनत जातो. आपल्या आसपास निरनिराळ्या स्वभावाची माणसे आढळून येतात. कोणी प्रेमळ असतात, कोणी तापट असतात, तर कोणी मिलनसार असतात. परंतू काही माणसांना भेटून

क्लिष्ट स्वभावाचे दुष्परीणाम Read More »

अर्धांगिनी जशी तुळस अंगणी

भार्या, बायको, पत्नी, सहचारीणी, अर्धांगिनी, जीवनाची जोडीदार अशा कितीतरी नावांनी ओळखली जाते. जेव्हा वैवाहीक बंधनात अडकून एक कुमारीका व आई-वडीलांची लाडकी लेक एका अनोळखी पुरूषाच्या आयुष्यात पदार्पण करते. जो तिच्या जीवनाचा जोडीदार असतो. समाजाच्या नियमाप्रमाणे व पुरूषप्रधान संस्कृतीनुसार आजतागायत मुलींनाच आपल्या आई-वडीलांचे घर सोडून जीवनाच्या जोडीदारासवे त्याच्या घरी कायमचे जावे लागते. परंतू मुलींनाही निसर्गाने कणखर मनाच्या धनी बनविलेले असते. जेणेकरून त्या त्यांच्या

अर्धांगिनी जशी तुळस अंगणी Read More »

आशिर्वादांची जमापुंजी

जेव्हा आपली प्रिय व्यक्ती मृत्युच्या दारात उभी असते. तसेच मृत्युला हुलकावणी देण्यासाठी हॉस्पिटलच्या बेडवर संघर्ष करत असते. त्यावेळी विज्ञानानेही हात टेकलेले असतात. पुढे काय होईल ह्याची शाश्वती नसते. अशावेळी सगळे मनोमन त्या व्यक्तीच्या जीवनाच्या सुरक्षेकरीता प्रार्थना करीत असतात. परंतू आपल्या सर्वांच्या त्या प्रार्थनेस व आशिर्वादास मात्र सृष्टीच्या विशाल उर्जेचे पाठबळच प्रभावशाली बनवीत असते. तेव्हाच एखादा

आशिर्वादांची जमापुंजी Read More »

बालपण

  बालपणाचा काळ सुखाचा असे म्हणणे अगदी योग्य आहे . कारण ती अगदी निरागस रुपात आपल्या जीवनाची सुरवात असते. ज्यावर भविष्यात संपुर्ण अध्याय लिहीला जाणार असतो. बालपण म्हणजे स्वच्छ व चकचकीत कोरी पाटी. बालपण म्हणजे वयाचा असा टप्पा ज्यात जसा सहवास लाभेल, जे कानी पडेल, जे डोळ्यांनी पाहू त्याचेच अनुकरण करत करत एक व्यक्तीमत्व घडण्यास सुरवात होते. बालपण

बालपण Read More »

वारसा

आजच्या आधुनिक युगातील पिढीने नव्याचा ध्यास घेतलेला आहे. ज्यात परप्रांतीय पेहरावा पासून खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत सर्वकाही बदलले आहे. पूर्वी जे पेहराव दैनंदिन जीवनाचा भाग होते ते आता विशेष कौटूंबिक कार्यक्रमासाठी किंवा इतरही सांस्कृतीक कार्यक्रमात खास पोषाख म्हणून वापरले जावू लागले आहेत. घरात लहान मुलांना मातृभाषेऐवजी इंग्रजी बोलण्याचे शिकवण्यात येवू लागले आहे. जेणेकरून ते इंग्रजी बोलण्यात तरबेज

वारसा Read More »

दुसरी संधी

जीवनात कधी मागे वळून बघण्याची सवड मिळाली  किंवा इच्छा झाली. तर आपल्याला भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचे स्वरूप बदलवून त्यांना पुन्हा जगावेसे वाटते. कारण त्यामुळे वर्तमानातील अनेक दृश्य वेगळी व आपल्याला पाहिजे तशी असू शकली असती. परंतू अर्थातच ही कल्पना कधीही सत्यात उतरविता येत नाही. म्हणूनच बर्‍याचदा आपल्या आसपास अनेकांना आपण म्हणतांना ऐकतो कि पुन्हा संधी

दुसरी संधी Read More »