Rekha

घरात स्थिर उत्पन्न असण्याचे फायदे

 एकोणिसाव्या शतकात बहुतांशी लोक सरकारी नोकर्‍या करत असतांना दिसत असत. फार कमी म्हणजे विशिष्ट समाजातील लोकच व्यवसायांशी जुळलेले असायचे. तेव्हा जास्तीत जास्त घरांमध्ये पुरूष एकटा कमविणारा असायचा कारण घरातील स्त्रिया गृहिणीचे कर्तव्य पार पाडत असत. परंतू तरिही घरात आर्थिक नियोजन हे इतके सुनियोजीत असायचे कि एकट्या कमविणार्‍याच्या अत्यंत कमी वेतनातही संपुर्ण कुटूंब सुख समाधानाने जीवन […]

घरात स्थिर उत्पन्न असण्याचे फायदे Read More »

क्लिष्ट स्वभावाचे दुष्परीणाम

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. कोणत्याही माणसाची ओळख त्याच्या स्वभावावरून होत असते. आपले बालपण कसे व कोठे गेले तसेच आपण त्यामधून काय शिकत गेलो आणि मोठे होता होता आपल्यात काय राहून गेले त्यावरून आपला स्वभाव बनत जातो. आपल्या आसपास निरनिराळ्या स्वभावाची माणसे आढळून येतात. कोणी प्रेमळ असतात, कोणी तापट असतात, तर कोणी मिलनसार असतात. परंतू काही माणसांना भेटून

क्लिष्ट स्वभावाचे दुष्परीणाम Read More »

अर्धांगिनी जशी तुळस अंगणी

भार्या, बायको, पत्नी, सहचारीणी, अर्धांगिनी, जीवनाची जोडीदार अशा कितीतरी नावांनी ओळखली जाते. जेव्हा वैवाहीक बंधनात अडकून एक कुमारीका व आई-वडीलांची लाडकी लेक एका अनोळखी पुरूषाच्या आयुष्यात पदार्पण करते. जो तिच्या जीवनाचा जोडीदार असतो. समाजाच्या नियमाप्रमाणे व पुरूषप्रधान संस्कृतीनुसार आजतागायत मुलींनाच आपल्या आई-वडीलांचे घर सोडून जीवनाच्या जोडीदारासवे त्याच्या घरी कायमचे जावे लागते. परंतू मुलींनाही निसर्गाने कणखर मनाच्या धनी बनविलेले असते. जेणेकरून त्या त्यांच्या

अर्धांगिनी जशी तुळस अंगणी Read More »

आशिर्वादांची जमापुंजी

जेव्हा आपली प्रिय व्यक्ती मृत्युच्या दारात उभी असते. तसेच मृत्युला हुलकावणी देण्यासाठी हॉस्पिटलच्या बेडवर संघर्ष करत असते. त्यावेळी विज्ञानानेही हात टेकलेले असतात. पुढे काय होईल ह्याची शाश्वती नसते. अशावेळी सगळे मनोमन त्या व्यक्तीच्या जीवनाच्या सुरक्षेकरीता प्रार्थना करीत असतात. परंतू आपल्या सर्वांच्या त्या प्रार्थनेस व आशिर्वादास मात्र सृष्टीच्या विशाल उर्जेचे पाठबळच प्रभावशाली बनवीत असते. तेव्हाच एखादा

आशिर्वादांची जमापुंजी Read More »

बालपण

  बालपणाचा काळ सुखाचा असे म्हणणे अगदी योग्य आहे . कारण ती अगदी निरागस रुपात आपल्या जीवनाची सुरवात असते. ज्यावर भविष्यात संपुर्ण अध्याय लिहीला जाणार असतो. बालपण म्हणजे स्वच्छ व चकचकीत कोरी पाटी. बालपण म्हणजे वयाचा असा टप्पा ज्यात जसा सहवास लाभेल, जे कानी पडेल, जे डोळ्यांनी पाहू त्याचेच अनुकरण करत करत एक व्यक्तीमत्व घडण्यास सुरवात होते. बालपण

बालपण Read More »

वारसा

आजच्या आधुनिक युगातील पिढीने नव्याचा ध्यास घेतलेला आहे. ज्यात परप्रांतीय पेहरावा पासून खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत सर्वकाही बदलले आहे. पूर्वी जे पेहराव दैनंदिन जीवनाचा भाग होते ते आता विशेष कौटूंबिक कार्यक्रमासाठी किंवा इतरही सांस्कृतीक कार्यक्रमात खास पोषाख म्हणून वापरले जावू लागले आहेत. घरात लहान मुलांना मातृभाषेऐवजी इंग्रजी बोलण्याचे शिकवण्यात येवू लागले आहे. जेणेकरून ते इंग्रजी बोलण्यात तरबेज

वारसा Read More »

दुसरी संधी

जीवनात कधी मागे वळून बघण्याची सवड मिळाली  किंवा इच्छा झाली. तर आपल्याला भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचे स्वरूप बदलवून त्यांना पुन्हा जगावेसे वाटते. कारण त्यामुळे वर्तमानातील अनेक दृश्य वेगळी व आपल्याला पाहिजे तशी असू शकली असती. परंतू अर्थातच ही कल्पना कधीही सत्यात उतरविता येत नाही. म्हणूनच बर्‍याचदा आपल्या आसपास अनेकांना आपण म्हणतांना ऐकतो कि पुन्हा संधी

दुसरी संधी Read More »

विकास आणी त्याचा अर्थ

विकसीत होत जाणे तसेच प्रगती करणे हा सृष्टीचाच नियम आहे. निसर्गाच्या नियमात प्रत्येक अतिसुक्ष्म, सुक्ष्म गोष्टींचाही विचार असतो. त्यात सृष्टी व जीवसृष्टी यांच्यात ताळमेळ असतो. एका गोष्टीमुळे दुसरीचा विकास होण्यास आपोआपच मदत होते. जमीन आईप्रमाणे तिच्यावर वास्तव्य करणार्‍या जीवजंतू, वनस्पतींचा सांभाळ करते. जेव्हा ग्रिष्माच्या रखरखत्या उन्हाने जमिनीच्या पोटातील पाणि दुरवर निघून जाते तरिसुद्धा काही वनस्पती जमिनीवर तग

विकास आणी त्याचा अर्थ Read More »

आपली अद्वितीय ओळख

सृष्टीच्या नियमाप्रमाणे आपण जीवन मृत्यूच्या फेर्‍यात अडकलेलो असतो. परंतू आपल्या शरिराला मृत्यू येणे म्हणजे आपला अंत होणे असा त्याचा अर्थ होत नाही. तर मृत्यू येणे म्हणजे एका शरिराचा त्याग करून त्यातील जीवनरूपी उर्जेने सृष्टीच्या विशाल उर्जेत समाविष्ट होणे. तसेच पुन्हा नव्या शरिराच्या रुपात जन्म घेण्यासाठी शर्यतीत सहभागी होणे. अशाप्रकारे जुन्याचा अंत होवून नव्याची सुरवात होण्याची

आपली अद्वितीय ओळख Read More »

आत्मसन्मानाचा प्रवास

 घरात मुलगी जन्मास आली कि तिच्या येणाने घरादारात नवचैतन्य पसरते. तसेच तिच्या गोड सहवासाने कुटूंबियांच्याही जीवनाला सकारात्मकरीत्या कलाटणी मिळते. असा विलक्षण अनुभव प्रत्येक जण घेतो. ज्यांच्या घरी मुलीचा जन्म होतो. म्हणूनच मुलींचा जन्म सौभाग्याने होतो असे म्हंटले जाते. मुली लहानाच्या मोठ्या होत असतांना आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करण्यासाठी झटत असतात. मुलींना

आत्मसन्मानाचा प्रवास Read More »